Headlines

‘इतकी महाग?’ म्हणत थांबली, फुलवाल्याने म्हटलं ‘मग स्वतः उगवा’; वाक्य मनाला लागलं आणि घरीच फुलवली लिली! असं लावा रोप – how to plant lily for beginners at home


एका मुलीला १०० रुपयांची लिली महाग वाटली, तेव्हा फुलवाल्याने तिला “स्वतः उगवा” असं सांगितलं.हे वाक्य मनाला लागल्याने तिने जिद्दीने लिलीचं रोप लावलं आणि घरीच सुंदर फूल फुलवलं. तिची ही मेहनत आणि निसर्गावरचं प्रेम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं.

How to Grow Lily Flower at Home
फोटो सौजन्य :- @elisneo_haokip, iStock
फुलं ही प्रत्येकाच्या मनाला आनंद देणारी गोष्ट असते. घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत एखादं सुंदर फुल उमललं की वातावरणच बदलून जातं. अनेकांना बाजारातून सुंदर फुलं आणण्याची आवड असते, तर काही जण स्वतःच्या हाताने रोपं लावून ती वाढवण्याचा आनंद घेतात. असाच एक प्रेरणादायी प्रसंग सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका मुलीने फुलवाल्याच्या एका साध्या वाक्याला मनावर घेतलं आणि जिद्दीने स्वतःच्या घरी लिलीचे सुंदर फूल फुलवले.

सोशल मीडिया पेज Elisneo Haokip वर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये ही गोष्ट दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये एका मुलीने फुलवाल्याला लिलीच्या फुलाची किंमत विचारली. फुलवाल्याने सांगितले की, एका लिलीच्या फुलाची किंमत १०० रुपये आहे. किंमत ऐकून मुलीला ते थोडं महाग वाटलं. तिने आश्चर्याने म्हटलं की, “इतकी महाग?” यावर फुलवाला सहज म्हणाला, “मग स्वतः उगवा.” फुलवाल्याचे हे शब्द कदाचित सहज बोलले गेले असतील, पण त्या मुलीने ते आव्हान म्हणून घेतले. तिला हे वाक्य मनाला लागले आणि तिने ठरवले की बाजारातून फूल विकत घेण्यापेक्षा आपण स्वतःच लिलीचे रोप लावायचे आणि ते फुलवायचे. तिने मेहनत घेतली, योग्य पद्धतीने रोपाची काळजी घेतली आणि काही काळानंतर तिच्या घरात सुंदर लिलीचे फूल उमलले.

ही गोष्ट आपल्याला सांगते की, एखादी गोष्ट विकत घेण्यापेक्षा ती स्वतः निर्माण करण्याचा आनंद वेगळाच असतो. झाडे आणि फुलांची काळजी घेणे ही केवळ एक आवड नाही, तर संयम आणि मेहनत शिकवणारी प्रक्रिया आहे. रोप लावल्यापासून ते फुल येईपर्यंत प्रत्येक टप्प्यात आनंद आणि उत्सुकता असते. (फोटो सौजन्य :- @elisneo_haokip, iStock)

लिलीचे रोप कसे लावावे? (How to plant lilies for beginners)

लिलीचे रोप कसे लावावे? (How to plant lilies for beginners)

लिली हे सुंदर आणि आकर्षक फूल आहे. योग्य काळजी घेतली तर घरच्या घरी कुंडीतही लिलीचे रोप वाढवता येते. नवशिक्यांसाठी लिली लावण्याची सोपी पद्धत खाली दिली आहे.

योग्य कुंडी आणि माती निवडा

योग्य कुंडी आणि माती निवडा
  • लिलीच्या रोपासाठी पाणी न साचणारी कुंडी निवडावी. कुंडीच्या खाली पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र असणे आवश्यक आहे.
  • माती भुसभुशीत आणि सुपीक असावी. बागेची माती
  • कंपोस्ट खत
  • वाळू किंवा कोकोपीट
  • यांचे मिश्रण लिलीच्या वाढीसाठी चांगले ठरते.

कंद लावण्याची पद्धत

कंद लावण्याची पद्धत

कुंडीत माती भरल्यानंतर लिलीचा कंद सुमारे २ ते ३ इंच खोल लावावा. कंदाचा टोकाचा भाग वरच्या दिशेने ठेवावा. त्यावर हलकी माती टाकावी आणि थोडे पाणी द्यावे.

सूर्यप्रकाश आवश्यक आहे

सूर्यप्रकाश आवश्यक आहे

लिलीच्या रोपाला चांगल्या वाढीसाठी सकाळचा सूर्यप्रकाश मिळणे फायदेशीर असते. मात्र खूप कडक उन्हापासून रोपाचे संरक्षण करावे.

पाणी देण्याची योग्य पद्धत

पाणी देण्याची योग्य पद्धत

लिलीला जास्त पाणी देणे टाळावे. माती थोडी कोरडी वाटली की पाणी द्यावे. सतत ओलसर माती राहिल्यास कंद खराब होऊ शकतो.

खत आणि काळजी

खत आणि काळजी

रोपाची वाढ चांगली होण्यासाठी वेळोवेळी सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत द्यावे. झाडाची पाने पिवळी पडत असतील किंवा वाढ थांबत असेल तर माती आणि पाण्याची स्थिती तपासावी.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा