Headlines

यांना समाजातून हाकलून द्या, दिवसभर घोषणाबाजी अन् रात्री पार्ट्या, ते आंदोलन नव्हे कट होता; अभिनेते मुकेश खन्नांचा घणाघाती आरोप


Mukesh Khanna on CJP Students Protestors: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनावर अनेक सेलिब्रिटींनी सडकून टीका केली आहे. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा घेतली आहे.

Mukesh Khanna on CJP
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू होती. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी काही विद्यार्थ्यांच्या वागणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेवर टीका केली. यावर अनेक सेलिब्रिटी व्यक्त झाले आहेत. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी मोदींवर टीका करणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच शाळा घेतली आहे.

काही आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह आणि असभ्य भाषेवर ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी टीका केली. ‘कॉकरोच जनता पार्टी‘ आणि या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांवर निशाणा साधत खन्ना यांनी, “असे लोक खऱ्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करत नाहीत. यांना समाजातून हाकलून दिलं पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रियाही दिली आहे.

Maharashtra TimesSachin Goswami: जरा मेंदू ताब्यात घ्या,वापरा, फ्रेश वाटतं; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सचिन गोस्वामींनी सांगितली रामराज्याची व्याख्या
“हा तर कट, विद्यार्थी अशी भाषा वापरत नाहीत”
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपला राग व्यक्त केला. ते म्हणाले की, मी सध्या भारताबाहेर असलो तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील घडामोडींवर माझी बारीक लक्ष ठेवून आहे. NEET परीक्षा किंवा पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या खऱ्या विद्यार्थ्यांबद्दल मला सहानुभूती आहे. पण आंदोलनाच्या नावाखाली पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींबद्दल ज्या प्रकारे अत्यंत नीच आणि गलिच्छ भाषेचा वापर करण्यात आला, ते पाहून माझे मन हेलावलं आहे.”

मुकेश खन्ना यांनी पुढं दावा केला की, हे आंदोलन उत्स्फूर्त नसून पूर्णपणे नियोजीत होतं आणि यामागे मोठे राजकीय हेतू होते. हे लोक सरकार पाडण्याचे मनसुबे घेऊन आले होते. दिवसभर घोषणाबाजी करायची, शिवीगाळ करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या, हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण असू शकत नाही. पैशांसाठी देशात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्यांचा हा कट आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.


Maharashtra TimesMunmun Dutta on Discrimination: मान-सन्मान मिळतो ना कामाचं श्रेय; महिला कलाकारांसोबत भेदभाव होतोच, मुनमुन दत्तानं केली इंडस्ट्रीची पोलखोल

तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना थेट इशारा
या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना इशारा देताना मुकेश खन्ना म्हणाले की अशा लोकांच्या नादी लागून कॅमेऱ्यासमोर केलेली ही वर्तणूक इतिहासात नोंदवली गेली आहे. यामुळं तरुणांच्या भविष्यातील नोकरी आणि करिअरच्या संधींवर मोठा परिणाम होऊ शकतो. देशातील कोणत्याही आई-वडिलांनी आपल्या मुलांकडून पंतप्रधानांना अशा शिव्या देताना ऐकलं, तर त्यांची मान शरमेनं खाली झुकल्याशिवाय राहणार नाही. अशा संगतीत राहून तुम्ही स्वतःचं आयुष्य खराब करत आहात. अशा लोकांच्या जाळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडा, असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं.