Headlines

वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2027बाबत ICCकडून मोठी घोषणा, आता 12 नाहीतर 14 संघ आणि 57 सामने, कसा असणार फॉरमॅट,जाणून घ्या


ODI World Cup 2027 News : वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2027ची आयसीसीने घोषणा केली आहे. यंदाचा वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात मोठा असणार आहे. पण नेमके नियोजन कसे असणार? सर्व काही सविस्तर जाणून घ्या.

ODI World Cup 2027
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयसीसीने गुरुवारी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२७ बाबत मोठी घोषणा केली. २४ वर्षांनंतर ५० ओव्हरचा थरार आफ्रिकेच्या भूमीवर रंगणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तिन्ही देशांमध्ये मिळून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. २०२३ मध्ये फक्त १० टीम होत्या. पण २०२७ मध्ये संघांची संख्या वाढून १४ झाली आहे. आयसीने स्पर्धेसाठी पूर्णपणे नवा फॉरमॅट जाहीर केला आहे. यंदा एकूण ५७ सामने होतील आणि स्पर्धा ३ टप्प्यात पार पडणार आहे.

पहिला टप्पा म्हणजे ‘सुपर सीरीज’. यात आयसीसी क्रमवारीतील १२, १३ आणि १४ व्या क्रमांकाच्या तीन टीम एकमेकींशी राऊंड-रॉबिन पद्धतीने भिडतील. यातून फक्त एकच टीम मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरेल. दुसऱ्या टप्प्यात १२ टीम्सना दोन ग्रुपमध्ये विभागले जाईल. प्रत्येक ग्रुपमध्ये ६-६ टीम असतील. लीग पद्धतीने प्रत्येक टीम आपल्या ग्रुपमधील इतर ५ टीम्ससोबत खेळेल. तिसरा टप्पा म्हणजे ‘सुपर-७’. ग्रुप स्टेज संपल्यानंतर दोन्ही ग्रुपमधील टॉप ३ टीम आणि गुणतालिकेतील ७व्या क्रमांकाची टीम या टप्प्यात प्रवेश करतील. येथे एकूण २१ सामने होतील. सुपर-७ च्या शेवटी गुणतालिकेतील पहिल्या ४ टीम थेट सेमीफायनलमध्ये जातील. पहिल्या क्रमांकाची टीम चौथ्या क्रमांकाच्या टीमसोबत, तर दुसरी आणि तिसरी टीम दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आमने-सामने येतील.

Maharashtra TimesAjinkya Rahane : आणखी काय हवं! माझा सर्वात लाडका पार्टनर, अजिंक्य रहाणेला निवृत्तीनंतर दिग्गजांच्या आभाळभर शुभेच्छा, यशाचा गाजावाजा न करणारा क्रिकेटपटू

यजमान आणि ठिकाणे

२००३ नंतर दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कप होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत झिम्बाब्वे आणि नामिबिया देखील सह-यजमान आहेत. दक्षिण आफ्रिकेतील ८ शहरांमध्ये सामने होतील. यात जोहान्सबर्गचे वांडरर्स, सेंचुरियन, केप टाऊनचे न्यूलँड्स, डरबनचे किंग्समीड, गकबेरहाचे सेंट जॉर्ज पार्क, ब्लोमफोंटेनचे मॅंगाउंग ओव्हल, पार्लचे बोलंड पार्क आणि कुगोम्पो सिटीचे बफेलो पार्क यांचा समावेश आहे. झिम्बाब्वेत हरारे स्पोर्ट्स क्लब, बुलावायोचा क्वीन्स स्पोर्ट्स क्लब आणि व्हिक्टोरिया फॉल्सचे फाले मोसी-ओ-तुन्या स्टेडियम या ३ ठिकाणी सामने होतील. नामिबियातील विंडहोक येथील नामिबिया क्रिकेट ग्राउंडवर देखील सामने खेळवले जातील.

Maharashtra TimesDilip Vengsarkar : ‘अजिंक्यवर अन्याय झाला… ऑस्ट्रेलियाला लोळवल्यावरही बाकावर बसवलं’; रहाणेच्या निवृत्तीनंतर माजी क्रिकेटर वेंगसरकर उघड बोलले
आयसीने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कार्यक्रमात वर्ल्ड कप २०२७ चा अधिकृत लोगो देखील लॉन्च केला. २०१९ आणि २०२३ च्या लोगोसारखाच शेप ठेवत त्यात आफ्रिकेचे रंग आणि एलिमेंट्स जोडण्यात आले आहेत. एकूणच १४ टीम, ५७ सामने आणि ३ देशांसह २०२७ चा वर्ल्ड कप हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक ठरणार आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा