Headlines

‘एल निनो’ काळात जुलैमध्ये अधिक पाऊस! हवामान बदलामुळे मान्सूनचा अंदाज अनिश्चित; महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा| Maharashtra Times


म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘एल निनो’ घटक सक्रिय झालेला असताना जुलैमध्ये विविध प्रणालींमुळे पावसाला चालना मिळाली. यामुळे देशभरातील पाऊस १ जून ते ३० जुलै या कालावधीत सरासरीच्या श्रेणीत आला असून ३० जुलैच्या सकाळपर्यंत देशभरात १४ टक्के तूट होती. त्यामुळे ‘एल निनो’ काळातील जुलैमधील पाऊस हा आश्चर्याचे कारण ठरल्याची चर्चा हवामान अभ्यासकांमध्ये आहे.

जुलैमधील पावसाचे ‘क्लायमेट ट्रेंड्स’तर्फे विश्लेषण करण्यात आले असून, देशातील ६० टक्के क्षेत्रामध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. देशभरात जुलै महिन्यामध्ये सरासरी २८०.४ मिलीमीटर पाऊस पडतो. २६ जुलैपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार केलेल्या विश्लेषणामध्ये १ ते २६ जुलैदरम्यान देशभरात २३८.२ मिलीमीटर पाऊस पडला. सर्वसाधारणपणे या कालावधीत २३३.९ मिलीमीटर पाऊस नोंदला जातो. त्यामुळे जुलैमध्ये सरासरीहून कमी पावसाचा अंदाज चुकल्याचे दिसते. जूनमध्ये ४० टक्क्यांपर्यंत पावसाची तूट होती. ही तूट ३० जुलैपर्यंत १५ टक्क्यांपर्यंत कमी झाली. सध्या भारतात होणाऱ्या पावसामागे दोन महत्त्वाचे घटक कारणीभूत आहेत.

Maharashtra TimesVidarbha Rain: विदर्भाला पावसाचा तडाखा! गडचिरोली जिल्ह्यातील 24 प्रमुख मार्ग बंद, भामरागडमध्ये सातशे जण सुरक्षितस्थळी

जुलै २०२६ मध्ये ‘एल निनो’मुळे पावसावर होणारा नकारात्मक परिणाम भरून काढून, पश्चिम प्रशांत महासागरातील (फिलिपिन्सच्या पश्चिमेकडील) वाढते तापमान मान्सूनसाठी तारणहार ठरत आहे. आतापर्यंत, म्यानमारमार्गे तीन कमी दाबाच्या प्रणाली पुढे सरकल्या आहेत, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी दिली. मान्सूनच्या काळात वाढलेल्या पश्चिमी प्रकोपामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात आर्द्रता येत आहे, ज्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, असेही ते म्हणाले.

ठाणे, पालघर, रायगडला ऑरेंज अॅलर्ट

मध्य छत्तीसगडच्या पश्चिम भागावर आणि लगतच्या पूर्व मध्य प्रदेशावर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र नैर्ऋत्य दिशेकडे सरकले आहे. आज, शुक्रवारी या क्षेत्रामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याचा काही भाग तसेच नाशिक आणि पुणे घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी कोकण विभागात पालघर, ठाणे तसेच रायगड जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. या काळात वाऱ्यांचा जोरही काही काळासाठी ७० किलोमीटर प्रति तास होऊ शकेल.

मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

शहरात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार, काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ‘रेड ॲलर्ट’ दिला आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने तुरळक ठिकाणी आणि थोड्याच वेळासाठी हजेरी लावली. दिवसभर आकाशात ढग दाटून आले होते, जोरदार पावसाची चिन्हे होती. पण, संध्याकाळीच काही भागांत हलक्या सरी पडल्या. दुपारी जोराचे वारे वाहत असल्याने उकाडा जाणवला नाही. दिवसभरात कमाल २७.४ आणि किमान २३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. जिल्ह्यात भोर, वेल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला; तर घाटात मध्यम आणि काही भागांत मुसळधार पाऊस पडला.

सध्या बंगालच्या उपसागरात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, छत्तीसगड राज्यावर ते सक्रिय आहे. शुक्रवारपर्यंत हे क्षेत्र मध्य प्रदेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे शनिवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस पडणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस

छत्तिसगड आणि परिसरातील बदलत्या हवामान प्रणालींमुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात पावसाने थैमान घातलं आहे. तसेच, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या २४ तासांत ही स्थिती आणखी वाढण्याची शक्यता असून यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांमध्येही रेड अलर्ट दिला असून पावसाचा जोर कायम राहणार आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत