‘जीवनाचे सत्य हेच आहे की, प्रत्येक सुरुवातीचा एक शेवट असतो. या सत्याचा सन्मान करून पुढे जाण्याची वेळ आली आहे. फलंदाजीत मी नेहमीच ‘टायमिंग’वर विश्वास ठेवला, आताही तेच करत आहे’, असे अजिंक्य म्हणाला. या संवादादरम्यान त्याचे भावूक होणेही स्वाभाविकच होते. ‘मला आज वाटतेय की, पुढे जाण्याची योग्य वेळ आली आहे; म्हणूनच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि एकूणच सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. क्रिकेटला सुरुवात करताना मोठी किटबॅग घेऊन डोंबिवलीहून मुंबईकडे प्रवास केला. तेव्हापासून ते आतापर्यंत मी या खेळाला सर्वस्व अर्पण केले. सरावाचा पहिला दिवस, प्रत्येक डाव आणि फलंदाजीची प्रत्येक संधी स्वीकारताना मनात एकच स्वप्न होते, भारताचे प्रतिनिधित्व करणे…’, असेही अजिंक्यने सांगितले.
Jayden seales : 18 धावांत 5 विकेट्स, पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरला; कोण आहे वेस्ट इंडिजचा स्टार जेडन सील्स?
सध्या अजिंक्य जगभरात विविध भाषांमध्ये क्रिकेट समालोचन करत आहे. यामुळे आपण खेळाशी कायम जोडलेले राहू, असे तो सांगतो. ‘मी कायमच देशाला प्राधान्य देत संघहीत जपले, तसा नियमच मी मानला. मी प्रामाणिक क्रिकेट खेळलो. मी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू म्हणून सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत भारतीय क्रिकेटने बरीच प्रगती केली आहे. गेल्या २० वर्षांपासून मी या प्रगतीचा एक भाग आहे, याचा मला अभिमान वाटतो’, असे अजिंक्य म्हणाला.
Dilip Vengsarkar : ‘अजिंक्यवर अन्याय झाला… ऑस्ट्रेलियाला लोळवल्यावरही बाकावर बसवलं’; रहाणेच्या निवृत्तीनंतर माजी क्रिकेटर वेंगसरकर उघड बोलले
कसोटीत फलंदाजी करताना माझा सर्वांत लाडका जोडीदार… जिंक्स (अजिंक्य) शानदार कारकिर्दीबद्दल अभिनंदन, मित्रा, तुझे योगदान मोठे आहे. तुझ्यासह स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणेही पर्वणीच वाटत असे. देव तुला नेहमी आनंदी ठेवो, असं विराट कोहली म्हणाला.
Ajinkya Rahane Retirement : तुझं जास्त कौतुक झालं नाही, पण तरीही तूच आमचा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई-वडिलांचं भावूक पत्र
अजिंक्य मैदानात आणि मैदानाबाहेरही तुझ्यासोबतचे क्षण मला सन्मानाचे वाटतात. पुढील वाटचालीसाठी तुला आणि तुझ्या कुटुंबाला अनेक शुभेच्छा. तुझी कारकीर्द अभिमानास्पद आहे, असं चेतेश्वर पुजारा म्हणाला.
पुरेसे कौतुक न झालेला सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणजे अजिंक्य. परदेशात भारताचा सर्वांत मोठा, संस्मरणीय कसोटी मालिका विजय साकारणारा कर्णधार म्हणजे अजिंक्य… शांतचित्ताने गोलंदाजांची पिसे काढणारा, पण यशाचा कधीच गाजावाजा न करत सर्वोत्तम योगदान देणारा क्रिकेटपटू म्हणजे अजिंक्य… तुझी दुसरी इनिंगही अशीच सर्वोत्तमच ठरो, असं वीरेंदर सेहवाग याने म्हटलं आहे.
Mrunal Yashasvi Dating : मृणाल ठाकूरला डेट करतोय यशस्वी जयस्वाल? एका व्हिडिओने रंगलेल्या चर्चांमागचं सत्य काय?
जिंक्स (अजिंक्य) तुझे २०१४च्या इंग्लंड दौऱ्यावरील लॉर्ड्सला झालेले शतक मला आजही आठवते. भारतीय संघ दडपणाखाली होता, तू मात्र दर्जेदार खेळ करत डाव सावरत भारताला यश मिळवून दिलेस. तुझी कारकीर्द ही धैर्य, प्रतिकूल परिस्थितीत साकार झालेल्या अविश्वसनीय झुंजार खेळींचा परिपाठच आहे, असं पी. व्ही. सिंधू म्हणाली.
Ajinkya Rahane : मानलं भावा! अजिंक्य रहाणेने निवृत्ती घेतली पण 2015चा रेकॉर्ड कोणीच मोडू शकलं नाही, काय आहे तो अनब्रेकेबल विक्रम ; जाणून घ्या
भारतीय क्रिकेटमधील एका उल्लेखनीय अध्यायाचा हा समारोप आहे. क्रिकेटवरील श्रद्धा, दडपणाच्या स्थितीतही साकारलेल्या संयमी खेळी, असे सारेच उल्लेखनीय आहे. अजिंक्य रहाणे हा मुंबई क्रिकेटचा सर्वोत्तम ब्रँड अॅम्बेसिडर आहे. त्याचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले.

