Headlines

I Asked the Selectors But Got No Response Ajinkya Rahanes Old Video Goes Viral After Retirement | ‘मला आणखी क्रिकेट खेळायचं आहे पण…’, अजिंक्य रहाणेचा जुना व्हिडीओ व्हायरल, पाहून फॅन्स झाले भावुक


Ajinkya Rahane Old Video: अजिंक्य रहाणेनं आणखी एक संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळालं नाही. निवृत्तीनंतर त्याचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अजिंक्यचे चाहते भावुक झाले आहेत.

Ajinkya Rahane Retirement
(फोटो सौजन्य – @Naresh_Nehraa/x.com)
अजिंक्य रहाणेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण अजिंक्य रहाणे हा एक उत्कृष्ट फलंदाज होताच, पण त्याचबरोबर तो उत्तम कर्णधार म्हणूनही ओळखला जायचा. मुंबई क्रिकेट असो वा भारतीय आंतरराष्ट्रीय संघ, अजिंक्यनं कायम संघातील ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. त्यामुळे अजिंक्यची निवृत्ती ही खऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. असो, पण याच पार्श्वभूमीवर अजिंक्यचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो, “मला अजून क्रिकेट खेळायचं आहे. मला आणखी एक संधी हवी आहे,” असं म्हणताना दिसतो. जर तुम्ही अजिंक्यचे चाहते असाल, तर हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

काय म्हणाला अजिंक्य?

हा व्हिडीओ @Naresh_Nehraa या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. २०२५ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. त्यावेळी समालोचन करत असताना अजिंक्य रहाणेनं त्याला आणखी क्रिकेट खेळायचं असल्याचं सांगितलं होतं.

“मी निवड समितीच्या सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ती गोष्ट माझ्या हातात नव्हती. माझ्या हातात फक्त एवढंच आहे की क्रिकेट खेळत राहणं आणि त्या खेळाचा आनंद घेत राहणं. मला कसोटी क्रिकेट खेळायला आवडतं. लाल चेंडूवर खेळण्याची मजा काही औरच आहे. क्रिकेट या खेळावर माझं खूप प्रेम आहे.” असं संभाषण या व्हिडीओमध्ये अजिंक्य रहाणे करताना दिसत आहे.

…अन् पुन्हा अजिंक्यला संधी मिळाली नाही

अजिंक्य रहाणेनं भारतासाठी ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यानं ८ हजारांहून अधिक धावा केल्या, तर १५ शतकं आणि ५० हून अधिक अर्धशतकं झळकावली. “जहाँ मॅटर बड़े होते हैं, वहाँ अजिंक्य रहाणे खड़े होते हैं,” असं त्याच्याबद्दल म्हटलं जायचं. कारण संघ अडचणीत असताना त्यानं अनेकदा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

अजिंक्यनं शेवटचा कसोटी सामना २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC फायनलमध्ये खेळला होता. या सामन्यात त्यानं ८९ धावांची खेळी केली होती. मात्र, भारतीय संघाचा पराभव झाला. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसला, पण आंतरराष्ट्रीय संघात त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. आता त्याच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत असून चाहते त्यावर भावुक प्रतिक्रिया देत आहेत.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा