Headlines

Elcid Investments Share Crash; 3 रुपयावर 66,92,535 टक्के रिटर्न; MRF ला टक्कर देणारा करोडपती शेअर आता रोडवरती, गुंतवणूकदारांच्या पैशांना ग्रहण


Share Market News: शेअर बाजारात कोणता स्टॉक कमाल करून गुंतवणूकदारांना श्रीमंत करेल आणि कोणता एका क्षणात श्रीमंतीच्या शिखरावरून रस्त्यावर आणेल, याचा अंदाज लावणं अशक्य आहे. देशांतर्गत बाजारातील एका पेनी स्टॉकने असंच केलं आणि या स्टॉकच्या गुंतवणूकदारांना अक्षरशः अडकल्यासारखं वाटू लागलं आहे.

एकेकाळी केवळ 3 रुपये किंमतीचा पेनी स्टॉक3 लाख रुपयांपर्यंत उसळला होता आणि डोळ्यादेखत गुंतवणूकदर करोडपती बनलेले. पण, गेल्या काही वर्षांत या स्टॉकमधील तेजीला घसरणीचे ग्रहण लागले ज्यामुळे गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागत असून या तीन लाखांच्या उच्चांकी शिखरावरून स्टॉक अंदाजे 65 टक्के घसरला आहे.

Maharashtra TimesRussia Sanctions: रशियन तेलावर अमेरिकेचा डोळा, भारत पुन्हा निशाण्यावर; 100% टॅरिफची लटकती मोठी तलवार, विधेयकाला ग्रीन सिग्नल

शेअर बाजारातील सर्वात महागडा स्टॉक

एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, या स्टॉकच नाव कदाचितच कोणी विसरलं असेल. कधीकाळी तीन रुपयाच्या या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना बघताच बघता करोडपतींच्या पंक्तीत नेऊन बसवलं. 21 जून 2024 रोजी या पेनी स्टॉकची केवळ 3.53 रुपये होती आणि पाच महिन्यांनी 8 नोव्हेंबर 2024 रोजी अचानक 3.30 लाख रुपयांवर उसळली.

अशाप्रकारे, या पाच महिन्यांत गुंतवणूकदारांना 93,61,751 टक्क्यांचा धमाकेदार मल्टीबॅगर परतावा मिळाला आणि या फिनिक्स तेजीच्या जोरावर एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा एक शेअर MRF स्टॉकच्याही पुढे जाऊन देशातील सर्वात महागडा शेअर बनला.

Maharashtra TimesHousing Society Rules: फ्लॅटची बाल्कनी तोडून बेडरूम वाढवणे, ग्रिल लावणे महागात पडू शकते! हायकोर्टाने सरकारला कोणते निर्देश दिले? येथे वाचा

करोडपती स्टॉकला घसरणीचे ग्रहण

अशाप्रकारे, सर्वकालीन उच्चांकी झेप घेतल्यावर या करोडपती पेनी स्टॉकची किंमत इतकी झपाट्याने कोसळली की पाहून गुंतवणूकदारही थक्क झाले.8 नोव्हेंबर 2024 रोजी ज्या स्टॉकची किंमत 3.30 लाख रुपये होती, ती आता 30 जुलै 2026 पर्यंत 1,10,200 लाखांवर कमी झाली आहे. म्हणजे या काळात स्टॉकची किंमत 2.21 लाखांनी कमी झाली आहे.

एल्सिड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड एक नॉन-बँकिंग वित्तीय संस्था आणि इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपनी आहे, जी प्रामुख्याने शेअर्स, डिबेंचर्स आणि म्युच्युअल फंडांसारख्या इतर कॉर्पोरेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करते.

Maharashtra TimesGold Silver Rate: फेडच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल; सोन्याला झळाळी; चांदीत मात्र नरमाई, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

MRF शेअरची किंमत किती?

2024 मध्ये एमआरएफच्या पुढे जाऊन देशांतर्गत बाजारातील सर्वात महागडा स्टॉक ठरलेल्या Elcid Investment या कंपनीचा शेअर आता पिछाडीवर पडला आहे. गुरुवार, 30 जुलै रोजी, एमआरएफ शेअरची किंमत 1,34,870 लाखांच्या आसपास व्यवहार करत आहे. म्हणजे MRF शेअरची किंमत सध्या या एल्सिड स्टॉकपेक्षा 24,000 रुपयांनी महाग आहे.