Sangli Miraj Mahavitaran Substation Operator Sudhir Latwade was Killed by Watchman Son due to Refusal Charge the Bike; महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दुचाकी चार्जिंग करण्यास विरोध, वॉचमनच्या मुलाच्या डोक्यात सणक गेली; ऑनड्युटी ऑपरेटरला संपवलं
Sangli Miraj Mahavitaran Substation Operator Sudhir Latwade was Killed by Watchman Son due to Refusal Charge the Bike; महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दुचाकी चार्जिंग करण्यास विरोध, वॉचमनच्या मुलाच्या डोक्यात सणक गेली; ऑनड्युटी ऑपरेटरला संपवलं
Sangli Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
मिरज सबस्टेशन ऑपरेटर सुधीर लाटवडे हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीच्या मिरजमध्ये महावितरणच्या सब स्टेशनमध्ये घुसून महावितरणच्या ऑपरेटरचा डोक्यात रॉड घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडलीये. सुधीर लाटवडे असे खून झालेल्या ऑपरेटरचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित वॉचमनच्या मुलाला पोलिसांनी अटक केलीये.
15 दिवसांपूर्वीच हत्येची एक घटना शहरात घडली होती. सांगलीतील कृष्णा नदी काठावरील श्री स्वामी समर्थ घाटाजवळ वर्चस्ववाद आणि पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली. गुंड लखन इसरडे याच्यासह त्याच्या तीन ते चार साथीदारांनी हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचं काम सुरु होतं. चेतन तोरणे (वय 19, रा. टिम्बर एरिया वसाहत, सांगली) असं मृत तरुणाचं नाव आहे. संशयित इसरडे आणि मृत चेतन तोरणे एकेकाळी मित्र होते. त्यांच्यात किरकोळ वाद झाल्यानंतर तोरणे त्याची टोळी बनवत होता.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा