Headlines

Ashwini Mahangade:स्टार प्रवाहची अभिनेत्री रमली शेतात; टोमॅटोच्या पीकानं कुटुंबाला गरिबीतून सावरलं, अभिनयाच्या कमाईतून गावी घेतली हक्काची शेतजमीन


तन्वी गोलांडे, रुईया कॉलेज

मनोरंजनाच्या विविध माध्यमांमधील आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनं आपल्या सहजसुंदर अभिनयानं वेगळा ठसा उमटवला आहे. ग्लॅमरस विश्वात आत्मविश्वासानं वावरत असतानाच अश्विनी पसरणी या तिच्या गावातल्या शेतातही तितकीच रमते. या दोन्ही टोकाच्या भूमिकांचा सुरेख समतोल ती नेहमीच साधताना दिसते. अभिनेत्री आणि शेतकरी या तिच्या अनोख्या भूमिकांबद्दल आणि मातीशी असलेल्या नात्याबद्दल अश्विनीनं ‘मुंटा’शी खास संवाद साधला.

लहानपणापासूनच आई-वडिलांना शेतात घाम गाळताना पाहिल्यामुळे मातीशी तिची नाळ आपसूकच जोडली गेली. ‘शाळेत असताना कुटुंबाला गरिबीतून सावरणारं टोमॅटोचं पीक असो वा बाबांची हळदीच्या शेतीची आवड, यानं मला शेतीचं मोल शिकवलं. अभिनयाच्या कमाईतून गावी स्वतःच्या हक्काची शेतजमीन खरेदी करत मी माझं स्वप्न पूर्ण केलं. आज आमच्या शेतात हळद, ऊस, ज्वारी आणि सोयाबीनसारखी पिके डोलतात’, असं अश्विनी सांगते.

Maharashtra TimesViju Mane Interview: चित्रपट चालला नाही तर आरशात बघा, ती चूक निर्माते, दिग्दर्शकाची; प्रेक्षकांकडे बोट दाखवण्याचं नाही; स्पष्टच बोलले विजू मानेमुंबईतल्या चित्रीकरणाच्या धावपळीतून दोन-तीन दिवसांची सुट्टी मिळाली, तरी अश्विनी थेट गावी धाव घेते. गावी गेल्यावर ती कोणतीही ‘सेलिब्रिटी’ नसून कुटुंबातील एक मुलगी असते. गोठा साफ करण्यापासून ते पिकांची निगा राखण्यापर्यंत सर्व कामं ती आवडीनं करते. ‘आई, भाऊ आणि वाहिनी शेतीची मुख्य धुरा सांभाळतात, त्यामुळे मी मुंबईत असते तेव्हा मला कसलीच चिंता नसते. मी तिथे फक्त एक मदतनीस म्हणून काम करते’, असं तिनं सांगितलं.

अवकाळी पाऊस असो वा बाजारातले चढ-उतार, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसूनही शेतकरी जसा पुन्हा नव्यानं उभा राहतो, तीच जिद्द अश्विनीमध्येही दिसते. यंदा पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाबद्दल ती हळहळ व्यक्त करते; पण त्याच वेळी बळीराजाच्या चिकाटीचं कौतुकही करते.

अभिनय आणि शेती दोन्हीचा समतोल साधण्याबाबत ती म्हणते, ‘इच्छा आणि आवड असेल, तर दोन्ही गोष्टी सांभाळायला आपोआप वेळ मिळतो. अभिनय हे माझं कामाचं क्षेत्र आहे, पण शेती हे माझं मूळ ! पडद्यावर अभिनय करताना मला ओळख मिळते, पण शेतात मातीत पाय रोवून उभं राहिल्यावर मला अंतरात्म्याचं समाधान मिळतं.

Maharashtra TimesSalman Khan Property Deal: एका वर्षात दुसरी प्रॉपर्टी डील, सलमान खानने विकला वांद्र्यातला अलिशान फ्लॅट, इतक्या कोटींना झाला व्यवहार
“शेती हा केवळ एक व्यवसाय किंवा छंद नसून तो एक संस्कार आहे. हजारो रुपये खर्च करून मेडिटेशनचा एखादा कोर्स करण्यापेक्षा शेताच्या बांधावर बसून शांत हिरवळ बघत बसणं, हेच माझं खरं मेडिटेशन आहे. शेतात काम करताना हाताला कितीही फोड आले, तरी त्या कष्टातून मिळालेलं पीक जे समाधान देऊन जातं, ते कशातच नाही.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत