Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:स्वच्छतेशी संबंधित काही चुका सुधारणे सोपे आहे




आपल्यापैकी किती जणांना खरोखर माहीत आहे की ज्या वस्तूंचा वापर आपण इतर वस्तू स्वच्छ करण्यासाठी करतो, त्यांनाही स्वच्छतेची गरज असते? उदाहरणार्थ, आपण सोफा व्हॅक्यूम क्लीन करतो, कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतो आणि ब्रशने टॉयलेट साफ करतो. पण तुम्ही या वस्तू किती वेळा साफ केल्या होत्या? वॉशिंग मशीन कशी साफ करायची याचा विचार करत आहात? तर मी काय करतो ते सांगतो. दोन महिन्यांतून एकदा, म्हणजे साधारण 20 वेळा वॉशिंग मशीन वापरल्यानंतर मी जमिनीवर बसतो, फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनच्या उजव्या कोपऱ्यातील छोटे झाकण एखाद्या चावीने उघडतो, छिद्रात अडकलेली घाण काढण्यासाठी प्लास्टिक नॉब अँटी-क्लॉकवाईज फिरवतो. यातून केवळ घाणेरडे पाणीच बाहेर येत नाही, तर अनेकदा मला नाणीही मिळतात, जी मी पँटमधून काढायला विसरलो होतो. अनेक वर्षांपूर्वी हे रहस्य मला माझ्या सर्व्हिसवाल्याने सांगितले होते, जेव्हा मी पाणी गळत असल्याची तक्रार केली होती. त्याला माझ्या घरी यायचे नव्हते. त्यानंतर मी मशीनमध्ये थोडे डिटर्जंट टाकून कपड्यांविना 30 मिनिटे चालवतो. स्वच्छतेशी संबंधित चुका अनेक प्रकारच्या असतात आणि काही जास्त गंभीरही असतात. बहुतांश प्रकरणांत या चुकांमुळे वस्तू आपल्याला हव्या तशा स्वच्छ होत नाहीत. यामुळे घरातील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, किंवा असे अवशेष राहतात ज्यामध्ये धूळ अडकू शकते. जसे की, लाँड्री डिटर्जंटने फरशी पुसणे. हे मला तेव्हा समजले, जेव्हा मी नुकतेच माझ्या घरासाठी खरेदी केलेल्या झाडू-पोछा करणाऱ्या मशीन ‘रुम्बा’ बद्दल वाचले. ‘रुम्बा’ने काम सुरू करण्यापूर्वी मी फरशीवर डिटर्जंटचे द्रावण शिंपडले, तेव्हा पाहिले की हे असे अवशेष सोडते, ज्यामध्ये घाण येऊन चिकटते. या घाणीमुळे मार्बलची फरशी फिकी दिसू लागते. मला खात्री आहे की आपल्यापैकी अनेक जण टेबल किंवा शोकेसवर एखादे क्लिनिंग लिक्विड स्प्रे करतात आणि ते सुकवण्यासाठी मेलामाइन फोम स्पंज फिरवतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. आधी स्पंज ओला करावा आणि क्लिनिंग लिक्विड साफ करण्याच्या जागेवर नाही, तर स्पंजवर स्प्रे करावे. हे मला तेव्हा समजले जेव्हा माझ्या शो-केसच्या सनमायका शीटची चमक कमी होऊ लागली, कारण माझी हाऊस-हेल्प नेहमी क्लिनिंग लिक्विड कडक पृष्ठभागावर स्प्रे करून स्पंज फिरवून ते सुकवत असे. अनेकांना वाटते की जास्त क्लिनिंग एजंट वापरल्याने वस्तू जास्त स्वच्छ होतील. पण सत्य याच्या उलट आहे. स्प्रे, फोमपासून पेस्ट आणि पावडरपर्यंत, कोणताही क्लिनर जास्त लावल्यास त्याचा उलटा परिणाम होतो. पृष्ठभाग पूर्वीपेक्षा जास्त घाणेरडा होतो. ही गोष्ट दोन कारणांमुळे योग्य आहे. 1. क्लिनिंग एजंट काढण्यासाठी तुम्हाला गरजेपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. 2. एवढे धुवून-पुसूनही पृष्ठभागावर एक थर राहू शकतो, ज्यावर धूळ आणि घाण चिकटेल. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ क्लिनिंग एजंट्स एकत्र मिसळण्याचा सल्ला देतात. पण जर तुम्हाला त्यांच्यातील सायंटिफिक रिअ‍ॅक्शन माहीत नसेल, तर तुम्ही दोन्ही एजंट्सचा प्रभाव नष्ट कराल. उदाहरणार्थ, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिसळल्यास तुमच्याकडे केवळ मीठपाणी उरेल आणि यामुळे बहुतांश वस्तू स्वच्छ होऊ शकत नाहीत. जरी त्याचे वेगाने येणारे बुडबुडे पाहून असे वाटते की ते डीप-क्लीन करत आहे, पण प्रत्यक्षात ते दोन्ही घटकांचे फायदेशीर गुणधर्म संपवून टाकते. याचप्रमाणे व्हिनेगर आणि डिटर्जंट एकत्र करणेही योग्य नाही. व्हिनेगरमधील अ‍ॅसिड डिटर्जंटच्या पीएच व्हॅल्यूला बदलू शकते, जे त्याच्या घट्टपणात बदल घडवून त्याला कमी प्रभावी बनवेल. फंडा असा की, थोड्याशा वैज्ञानिक माहितीच्या आधारे स्वच्छतेशी संबंधित सामान्य मात्र चुकीच्या सवयी सुधारता येऊ शकतात. यामुळे तुमचे घर अधिक स्वच्छ राहील आणि तुम्ही मोठ्या नुकसानीपासूनही वाचाल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत