Headlines

Share Market Today; इकडे भारतात Share Market सुस्साट, चिनी कंपनीची धूम, तिकडे कोरियाचा KOSPI धारातीर्थ! आव्हाने पेलून IT स्टॉक्सची झेप


Why Stock Market Rising Today: बुधवार, 29 जुलै रोजी, देशांतर्गत शेअर बाजाराने आयटी स्टॉक्समधील खरेदीच्या जोरावर तेजीची उभारी घेतली आहे. अमेरिकी बाजारात आदल्या दिवशी संमिश्र व्यवहार पार पडल्यावर आयटी शेअर्सच्या खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली. आयटी निर्देशांकात 2.5% वाढ झाली, ज्यामुळे सलग तीन दिवसांची तेजी 8 टक्क्यांच्या पुढे गेली.

KOSPI Crash vs India Stock Market Rally Reasons
इकडे भारतात Share Market सुस्साट, तिकडे कोरियाचा KOSPI धारातीर्थ! आव्हाने पेलून IT स्टॉक्सची झेप(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Stock Market Today: जागतिक Tech मार्केटमध्ये एकाच आठवड्यात 3 वेगवेगळ्या देशांमधून परस्परविरोधी हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. आयटी आणि चिप कंपन्यांच्या शेअर्सच्या मोठ्या विक्रीमुळे दक्षिण कोरियाचा KOSPI ऐतिहासिक नीचांकीवर घसरला तर, दुसरीकडे चीनच्या आघाडीच्या मेमरी चिप उत्पादक कंपनी CXMT च्या ब्लॉकबस्टर आयपीओने बाजारात खळबळ उडवून दिली. तसेच भारतीय आयटी शेअर्समध्ये तेजीचा कल दिसत आहे.

शेअर बाजारात आयटी स्टॉक्सचा बोलबाला

देशांतर्गत बाजारातील सॉफ्टवेअर स्टॉक्स जागतिक चिप उत्पादकांच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात मोठी मासिक उत्कृष्ट कामगिरीसाठी सज्ज झाले आहेत. यामधून गुंतवणूकदार आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या व्यापारातून बाहेर पडून उतरलेल्या आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे संकेत देत आहेत.

Maharashtra TimesGold Silver Price Today: सोन्याची झळाळी उतरली! चांदीही झाली स्वस्त; खरेदीसाठी योग्य वेळ? फेडच्या निर्णयाकडे संपूर्ण जगाचे लक्ष
गुंतवणूकदार चिप स्टॉक्समधील एआय-चालित तेजीला कंटाळत आहेत, तर दुसरीकडे अनेक वर्षांच्या मंदीनंतर भारतातील आयटी सेवा कंपन्यांमध्ये त्यांची रुची पुन्हा वाढत असल्याचे अलीकडच्या एआय किंवा चिप स्टॉक्समधील घसरण सूचित करते.

गेल्या काही महिन्यांपासून जागतिक सेमीकंडक्टर आणि एआय क्षेत्रातील घडामोडींचा निर्देशांक – दक्षिण कोरियाचा कोस्पी – जूनच्या मध्यातील उच्चांकावरून 30% हून अधिक घसरला आहे. जेफरीज फायनान्शियल ग्रुप इंकने गेल्या आठवड्यात भारताच्या आयटी क्षेत्राला ‘न्यूट्रल’ रेटिंग दिले एआय क्षेत्रातील व्यवहारांमध्ये उलटफेर झाल्यास धोरणात्मक तेजी येण्याची शक्यता वर्तवली.

भारतातील IT स्टॉक्स जोमात

दक्षिण कोरियन शेअर मार्केट अब्जावधी डॉलर्सच्या AI पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक आणि त्यातून मिळणाऱ्या परताव्याबद्दल अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला आहे, तर दुसरीकडे चीन देशांतर्गत चिप उत्पादनातील आत्मनिर्भरता आणि सरकारी पाठिंब्यामुळे नवनवीन रेकॉर्डवर रेकॉर्ड करत आहे.

Maharashtra TimesIndia LPG Imports: भारताने इंधन धोरणच बदलले! स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात होणार बदल, LPG ची चिंता मिटणार? सरकारचा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न
याउलट देशांतर्गत बाजार हार्डवेअर किंवा चिप उत्पादनाऐवजी सॉफ्टवेअर आणि आयटी सेवांवर अवलंबून असल्यामुळे या चिप स्टॉक्समधील गोंधळाचा भारताला थेट फटका बसलेला नाही, उलट सुरक्षित आश्रयस्थान म्हणून भारतीय आयटी क्षेत्रालाच फायदा झाला.

जागतिक चिप बाजारातील गोंधळ, अमेरिकी निर्बंध आणि एआय क्रांतीला बाजाराकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया, या सर्वांचा एकाच वेळी 3 आशियाई अर्थव्यवस्थांवर वेगवेगळ्या प्रकारे कसा परिणाम होतो यामधून दिसून येते.

Maharashtra TimesEPF Withdrawal Rules Explained: नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफच्या पैशातून घर खरेदी, होम लोन फेडण्यापूर्वी 4 रिस्क लक्षात घ्या, अन्यथा नुकसान होणारच

शेअर बाजाराची सद्यस्थिती काय

आयटी शेअर्समधील खरेदीसह विविध कारणांमुळे 29 जुलै रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी यांसारख्या प्रमुख शेअर बाजार निर्देशांकांची जवळपास 1% वाढीसह ‘गॅप-अप’ सुरुवात केली. सकाळी 9:41 वाजता मुंबई शेअर मार्केट 779.74 अंकांनी वाढून 77,545.66 वर उसळला तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 224.50 अंक किंवा 0.94% वाढीसह 24,209.85 वर पोहोचला.

देशांतर्गत आयटी स्टॉक्सपैकी इन्फोसिसने सर्वाधिक 3.56 टक्के वाढ नोंदवली. तसेच एल अँड टी, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, इटरनल, टेक महिंद्रा, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली. या तेजीच्या उलट मारुती, टायटन, एनटीपीसी, एशियन पेंट्स, इंडिगो आणि पॉवर ग्रिड यांचे शेअर्स घसरणीसह उघडले.