Headlines

वयाच्या 33 व्या वर्षी टीम इंंडियामध्ये निवड झालेला सारांश जैन नेमका कोण? श्रीलंकेत गाजवलंय मैदान


Who is Saransh Jain : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. ३३ वर्षाच्या सारांश जैन या खेळाडूची निवड झाली आहे. नेमका कोण आहे हा सारांश जैन आणि त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीबद्दल जाणून घ्या.

Saransh Jain
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका गमावलेल्या भारतीय कसोटी क्रिकेट संघात अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी फारसे बदल टाळण्यात आले. आताही श्रीलंकेतील दोन कसोटीसाठी संघात फारसा बदल न करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला, सारांश जैन सोडल्यास संघात एकही नवीन चेहरा नाही. अजित आगरकर अध्यक्ष असलेल्या निवड समितीने साई सुदर्शन तसेच जसप्रीत बुमराह या तंदुरुस्त नसलेल्या खेळाडूंची निवड केली आहे. श्रीलंकेत फिरकीस अनुकुल खेळपट्ट्या असतील हे लक्षात घेऊन रवींद्र जाडेजाचा अनुभवाचा उपयोग करण्याचे ठरले. कुलदीप यादव काही सामन्यांपासून फारसा यशस्वी नसतानाही त्याच्यावर विश्वास दाखवण्यात आला.

सारांश जैन कोण आहे?

वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीच्यावेळी निवडीस उपलब्ध नसेल. त्यामुळे संघाचा समतोल साधला जाणार नाही हा विचार करून ऑफ स्पिनर सारांश जैनला पसंती देण्यात आली. भारतीय संघांत डावखुरे फिरकी गोलंदाज जास्त असताना सारांशची निवड झाली आहे. त्याने श्रीलंकेत अ संघातून खेळताना एका सामन्यांत सहा फलंदाज बाद केले होते.
Maharashtra TimesSharmila Dhankar : दोन वर्षांची असताना पोलिओ, घरगुती हिंसाचाराच्या होरपळीतून सुवर्णझेप; शर्मिला धनखडचा संघर्षमय प्रवास
मध्यप्रदेश संघाचा महत्त्वाचा खेळाडू असून सारांश जैन याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. ऑफ-स्पिन गोलंदाज असलेल्या सारांशने आतापर्यंत ५४ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये २७.३ च्या सरासरीने १८८ बळी घेतले आहेत. खालच्या क्रमावर उपयुक्त डावखुरा फलंदाज म्हणूनही त्यांनी ३१.७५ च्या सरासरीने २२३ धावा केल्या आहेत. यात १४ अर्धशतके आणि २ शतकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सेंट्रल झोनला दिलीप ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्या स्पर्धेत त्यामे २ सामन्यांमध्ये १६ बळी आणि १३६ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफी हंगामातही त्यांनी दमदार कामगिरी केली.५७.५५ च्या सरासरीने ५१८ धावा आणि २०.४३ च्या सरासरीने ३० विकेट त्याच्या नावावर आहेत.
Maharashtra TimesGautam Gambhir : गौतम गंभीरला हटवले तर टीम इंडियाची कमान कोणाकडे? हेड कोचसाठी 4 दिग्गज रेसमध्ये, एक सर्वात पुढे

हर्ष दुबेला वगळले

अफगाणिस्तानविरुद्ध सात फलंदाज बाद केलेल्या मानव सुतारने संघातील स्थान राखले, मात्र हर्ष दुबेला वगळण्यात आले आहे. जसप्रीत बुमराह तंदुरुस्त नसल्यास वेगवान गोलंदाज फारसे अनुभवी नसतील. सिराजने संघातील स्थान कायम राखले आहे. बुमराह नसल्यास प्रसिद्ध कृष्णा सिराजचा सहकारी असू शकेल. गुरनूर ब्रारला पुन्हा संधी देण्यात आली. अकीब नबीला पुन्हा राष्ट्रीय संघाबाहेर ठेवण्यात आले.
Maharashtra TimesIND vs ZIM Series : झिम्बाब्वेत भारताने मालिका जिंकली, पण मैदानाबाहेर फॅनची अजब मागणी! कोच लक्ष्मण, ईशान किशन का संकोचले?

भारतीय कसोटी संघ

शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनुर ब्रार, देवदत्त पडिक्कल आणि सारांश जैन.