मुंबईतील व्हीआयपी क्लब्सच्या किचनमध्ये FDA चे छापे, अवस्था पाहून थेट परवाने निलंबित – tukaram mundhe led fda raids mumbai renowned clubs and suspends fssai license
मुंबईतील व्हीआयपी क्लब्सच्या किचनमध्ये FDA चे छापे, अवस्था पाहून थेट परवाने निलंबित – tukaram mundhe led fda raids mumbai renowned clubs and suspends fssai license
मुंबईतले नामांकित, पॉश क्लब्स… तिथलं वातावरण, तिथली लक्झरी, झगमगाट आणि तिथलं चविष्ट जेवण…याची भुरळ सगळ्यांना पडते. आपल्याला वाटतं की, इथे हजारो-लाखो रुपये फी घेतात, म्हणजे सगळं एकदम स्वच्छ आणि नंबर वन असणार! पण… थांबा! तिथे जे जेवण बनतं तिथली अवस्था पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. किचनमध्ये झुरळांचा वावर… बुरशी लागलेल्या खराब भाज्या… गंजलेली भांडी आणि उपकरणं… आणि मुख्य म्हणजे, शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची एकत्र केलेली साठवणूक! हो, हे सगळं समोर आलंय एफडीएच्या धडक कारवाईत! अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील नामांकित क्लब्सवर छापे टाकण्यात आले. सात क्लब्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी झाली, अन् गंभीर त्रुटी आढळल्याने पाच मोठ्या क्लब्सचे FSSAI परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत! नक्की काय घडलं? कुठल्या क्लब्सवर कारवाई झाली? अन् तिथे काय काय त्रुटी आढळल्या आहेत तेच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात.