Neeraj Grover Case : दाक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसैराजनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून एका प्रसिद्ध बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टरची हत्या केली. त्यांनी पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता. ही घटना २००८ मध्ये घडली होती.

बॉयफ्रेंडनं केली कास्टिंग डायरेक्टरची हत्या
ही घटना २००८ मध्ये घडली. मारिया सुसैराजचा, लेफ्टनंट एमिल जेरोम मॅथ्यू नावाचा एक बॉयफ्रेंड होता. दोन महिन्यांत त्यांचा साखरपुडा होणार होता. नीरज ग्रोव्हर मारियाला टीव्ही इंडस्ट्रीमध्ये नाव कमावण्यासाठी करण्यासाठी मदत करत होते आणि त्यांनी तिच्यासाठी ऑडिशन्सचीही व्यवस्था केली होती. मारिया दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करत होती, पण हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यासाठी ती मुंबईला आली. तिनं एकदा तिचा बॉयफ्रेंड मॅथ्यूला सांगितलं होतं की, नीरज ग्रोव्हरला ती आवडते, पण तो तिला आवडत नाही. मारिया काही दिवस नीरज ग्रोव्हरच्या अपार्टमेंटमध्ये राहिली होती, असंही सांगितलं जातं.
Prashant Damle : आजकाल बाल्कनीचा प्रेक्षकवर्ग नाही, 500 रुपयांच्यावर आम्हाला जाता येत नाही; नाटकाच्या तिकीट दराबद्दल स्पष्टच बोलले प्रशांत दामले
मारिया, नीरज ग्रोव्हरला एका ऑडिशनमध्ये भेटली आणि तिथेच ते मित्र बनले. त्यानंतर, ६ मे २००८ रोजी, नीरज ग्रोव्हर तिच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये तिला भेटायला आला. मात्र, ६ तारखेनंतर नीरजचा काहीच पत्ता नव्हता. तो कुठे गेला होता हे कोणालाच माहीत नव्हतं. मित्र आणि कुटुंबीयांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी त्याला शोधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. २४ तासांहून अधिक वेळ उलटल्यावर, कुटुंबीयांनी पोलिसांकडे तो हरवल्याची तक्रार दाखल केली. नीरज ग्रोव्हरच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं की, त्याच्या एका मैत्रिणीचा बेपत्ता होण्यामध्ये सहभाग असू शकतो.
Rajesh Khanna : दत्तक घेतल्याचं समजताच बसला धक्का, सख्ख्या बहिणीनंही केलं परकं, लोकांवरचा विश्वास उडाला; राजेश खन्ना यांच्याबद्दल एक्स गर्लफ्रेंडचा दावा
पोलिसांच्या चौकशीदरम्यान, मारिया सुसैराजनं दावा केला की, नीरज ग्रोव्हर बेपत्ता होण्याच्या आदल्या रात्री तिला भेटला होता, पण रात्री १२:०० वाजता अंधेरीमध्ये मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी निघून गेला होता. मारियानं पोलिसांसमोर सत्य कबूल करण्यापूर्वी १० दिवस खोट्या कहाण्या रचल्या. तिनं पोलिसांना सांगितलं की तिचा प्रियकर, मॅथ्यूने तिच्या डोळ्यासमोर नीरज ग्रोव्हरची हत्या केली होती.
Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा
वृत्तानुसार, नीरज ग्रोव्हर ६ मे २००८ रोजी रात्री १०:०० वाजता मारिया सुसैराजला घरातील सामान लावण्यास मदत करण्यासाठी तिच्या मालाड येथील अपार्टमेंटमध्ये गेला होता. त्याच वेळी, मॅथ्यूने मारियाला फोन केला. मारियानं नीरज घरी आल्याचं सांगताच मॅथ्यूनं नीरजला रात्रभर तिथं न थांबण्यास सांगितलं. मॅथ्यू त्यावेळी कोचीमध्ये होता, पण मारियाला न कळवता दुसऱ्या दिवशी विमानानं तो मुंबईत आला. मॅथ्यू सकाळी ७:३० वाजता अभिनेत्रीच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला. मारियानं दरवाजा उघडला आणि मॅथ्यू थेट बेडरूममध्ये गेला. तिथं त्याला नीरज ग्रोव्हर दिसला.
Apara Mehta : ‘तू माझ्या आयुष्यातील कुरूप स्त्री’, लग्नाच्या वाढदिवशीच पतीकडून अपमान; २० वर्षांपासून नवऱ्यापासून वेगळी राहतेय अभिनेत्री
पोलिसांच्या अहवालानुसार, मॅथ्यू आणि नीरजमध्ये वाद झाला आणि झटापट झाली. या घटनेदरम्यान, मॅथ्यूनं स्वयंपाकघरातील चाकू उचलून नीरज ग्रोव्हरवर हल्ला केला आणि त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. क्राईम ब्रांचनं मारियाच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यांना एक ९-इंची चाकू सापडला. ग्रोव्हरच्या हत्येसाठी हाच चाकू वापरण्यात आला असावा, असा पोलिसांचा विश्वास होता. त्याच दिवशी, मारिया एका मॉलमध्ये गेली आणि तिनं बॅग्ज, एअर फ्रेशनर, पडदे, बेडशीट आणि एक चाकू खरेदी केला. नंतर मारियानं पोलिसांना सांगितलं की, हे सर्व मॅथ्यूच्या सांगण्यावरून केलं होतं. त्यानंतर, मारिया आणि मॅथ्यू नीरजचा मृतदेह स्वयंपाकघरात घेऊन गेले आणि त्याचे अनेक तुकडे करून ते बॅगांमध्ये भरले.
मारियानं एका मैत्रिणीकडून गाडी घेतली आणि ती बॅग गाडीच्या डिक्कीत ठेवली. वॉचमॅननं मारिया आणि मॅथ्यूला गाडीत सामान भरताना पाहिलं. त्याच दिवशी, मारिया आणि मॅथ्यूनं भाईंदरहून पेट्रोलच्या दोन बाटल्या विकत घेतल्या आणि ते मनोरकडे निघाले. त्यांनी ती बॅग पेट्रोलमध्ये भिजवून मनोरमधील आमगाव गावाजवळील जंगलात पेटवून दिली. मृतदेह जाळल्यानंतर ते त्याच रात्री मुंबईला परतले. २० मे २००८ रोजी मारियाला पोलीस कोठडीत नेण्यात आलं, तेव्हा तिने अनेक खोट्या कहाण्या रचल्यानंतर दबावाखाली येऊन मारियानं धक्कादायक खुलासा केला. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, मारियानं पोलिसांना सांगितलं की, ‘जेरोम मॅथ्यूनं नीरजची हत्या केली. त्यानं मृतदेहासमोर माझ्यावर बलात्कार केला आणि नंतर त्याचे तुकडे केले.’
Shagufta Ali : 26 वर्षाचं रिलेशनशिप, बॉयफ्रेंडचं अकाली निधन; सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग, म्हणाली, ‘मी खूप रडायचे’
या प्रकरणात मारियाला तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि २०११ मध्ये तिची तुरुंगातून सुटका झाली. पण, २०१५ मध्ये पोलिसांनी अभिनेत्रीला २.६ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली पुन्हा अटक केली.

