Headlines

‘वेटलिफ्टिंग क्वीन’ने मुकुट राखला, मीराबाई चानूकडून राष्ट्रकुल सुवर्णपदकाची हॅटट्रिक


Meerabai Chanu Gold Medal News : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये सुवर्ण कामगिरी करत मीराबाई चानू हिने शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. भारतासाठी तिने यंदाच्या स्पर्धेत पहिले पदक जिंकत ती सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली आहे.

Meerabai Chanu Gold Medal
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनायक राणे, ग्लास्गो : ‘भारताची वेटलिफ्टिंग क्वीन’, असे खणखणीत कामगिरीने कमावलेले टोपणनाव मीराबाई चानू हिने रविवारीही सार्थ ठरविले. ‘चॅम्पियन’ या बिरुदाला साजेशी कामगिरी करत या मणिपूरी कन्येने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅटट्रिक केली. यंदा ग्लास्गो येथे रंगलेल्या राष्ट्रकुलमध्ये ४८ किलो वजनी गटात एकूण १९० किलोंचा भार पेलत मीराबाईने जेतेपद राखले.

मीराबाईच्या निकालाबाबत किंवा जेतेपदाबाबत शंका नव्हती. स्पर्धेचे आयोजन होत असलेल्या एसइसी आर्माडिलो संकुलात सुरुवातीपासूनच उत्सुकता होती ती मीराबाई यंदा किती वजन उचलणार याची… ‘स्नॅच’मध्ये विक्रमी ८५ किलो तर ‘क्लिन अँड जर्क’मध्ये १०५ किलो वजन उंचावत तिने विश्वास सार्थ ठरविला. मीराबाईची कामगिरी एवढी जबदरदस्त होती की, तिच्या आणि रौप्यपदक विजेत्या नायजेरियाच्या रुथ असुको एनयाँगच्या कामगिरीत (एकूण १६८ किलो) २२ किलोंचा फरक होता.
Maharashtra TimesZandu Kumar : कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये भारताला पहिलं पदक जिंकून देणाऱ्या झंडू कुमारचं खरं नाव वेगळंच, आई कमला देवीकडून खुलासा
पदक सोहळ्यात मीराबाईचे डोळे पाणावले होते. तिला अश्रू रोखणेही कठीण झाले होते. या ऑलिम्पिक पदकविजेतीचा सुवर्णपदकापर्यंतचा प्रवासही सोपा नव्हता. ‘स्नॅच’ आणि ‘क्लीन अँड जर्क’ या दोन्ही शैलींतील पहिल्या प्रयत्नांत तिच्याकडून गडबड झाली होती. मात्र आत्मविश्वासाने परिपूर्ण मीराबाईने दणक्यात पुनरागमन करत खणखणीत कामगिरी करून दाखवली. कॉमनवेल्थ गेम्स २०१८, २०२२ आणि २०२६ मध्ये मीराबाई चानू हिने सुवर्ण पदकाची हॅट्रिक करत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. ‘स्नॅच’ आणि ‘क्लीन-अँड-जर्क’ अशा दोन्ही प्रकारांत मिळून एकूण १९० किलो वजन उचलले. मीराबाईचा विजय विशेष उल्लेखनीय ठरला, कारण तिने दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नायजेरियाच्या रुथ न्योंगपेक्षा २२ किलो अधिक वजन उचलले.
Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi : बेबी बॉस वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेला झोडलं, पठ्ठ्याचं शतक हुकलं, भारताकडून 193 धावांचे टार्गेट
याआधी बिहारच्या झंडू कुमार याने पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचं खातं उघडलं होतं. त्यानंतर ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या ६० किलो गटात रौप्यपदक मिळवलं. मीराबाईच्या सुवर्णानंतर आता भारताकडे १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ३ पदकं झाली आहेत.उपलब्धींची यादी मोठीमीराबाई चानू हे नाव आता भारतीय वेटलिफ्टिंगचं समानार्थी झालं आहे. टोक्यो २०२० ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून तिने इतिहास रचला होता.