माळशेज घाटात रस्ता खचल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. पण वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाकडून पर्यायी मार्गाने वाहतुकीचं आवाहन करण्यात आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : कल्याण – अहिल्यानगर राष्ट्रीय महमार्गावर माळशेज घाटात रस्ता खचल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. पण ही घटना अतिशय चित्तथरारक अशी आहे. माळशेज घाटात रस्ता खचल्याची दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. माळशेज घाटात करणजाळे गावाजवळ ही रस्ता खचल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर माळशेज घाटात एकेरी वाहतूक सुरु होती. पण ही वाहतूक केवळ छोट्या वाहनांसाठी सुरु होती. एसटी बस, ट्रक, टेम्पो इत्यादी अवजड वाहनांना या मार्गाने जाण्यास बंदी घालण्यात आली होती. पण भूस्खलन गंभीर स्वरुपाचे असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. या मार्गावरील वाहतूक पनवेल मार्गाने वळवण्यात आली आहे.
माळशेज घाटात रस्ता कोसळल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घटनास्थळी दाखल झालं. संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रस्ता तब्बल 5 ते 6 फूट खोल खचला आहे. तसेच 100 मीटरपर्यंतचा रस्ता खचला आहे. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एकेरी वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. तसेच या मार्गाची वाहतूक पनवेलच्या दिशेला वळवण्यात आली. आता सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गाने जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
प्रशासनाकडून या पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचं आवाहन
दरम्यान, पुढील आदेशापर्यंत माळशेज घाट हा वाहतुकीसाठी बंद असल्याचं प्रशासाने म्हटलं आहे. प्रशासनाकडून इतर मार्गाने वाहतूक करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून आता आळेफाटा–राजगुरुनगर–चाकण–ताळेगाव एमआयडीसी–लोणावळा– मुंबई किंवा आळेफाटा–संगमनेर–नाशिक–कसारा–कल्याण–मुंबई या पर्यायी मार्गांनी प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
घाट माथ्यावर वाहनचालकांनी काळजी घ्यावी
राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. घाट माथ्यावर तर मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडतो. माळशेज घाटातही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे घाट माथ्यावरील वातावरणात खूप बदल झालेला असतो. अनेकदा घाट माथ्यावरच्या रस्त्यांवर धुकं पसरलेलं असतं. तसेच मुसळधार पाऊस देखील पडतो. अशावेळी वाहनचालकांपुढील चॅलेंज मोठं असतं. वाहनचालकांना यावेळी रस्ता दिसेनासा होतो.
अशावेळी गाडी चालवणं हे मोठं आव्हानात्मक होतं. अशावेळी दुर्घटना घडण्याची देखील भीती असते. त्यामुळे पावसाळ्यात अशा घाटमाथ्यावरुन प्रवास करणं टाळलं पाहिजे. अनेक जण माळशेज घाटात पावसाळी सहल म्हणून जातात. घाटात कुठेतरी थांबतात आणि सेल्फी काढतात. काही जण घाटात धबधबा बघून गाडी बाजूला लावतात आणि तिथे सेल्फी काढण्यासाठी थांबतात. पण असं कृत्य जीवावर बेतू शकतं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा