पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नाशिकमधील जिल्हा संवर्धन उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात या उपक्रमाची दखल घेतली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ केली. या उपक्रमात नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलसंवर्धन उपक्रमाची त्यांनी दखल घेत उल्लेख केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात कॅच द रेन (Catch the Rain) अभियान राबविण्यात येत आहे. त्यात लोकसहभाग, विभागीय समन्वय आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे जलसुरक्षा बळकट करण्यात येत आहे. यामध्ये जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना, नाला खोलीकरण व रुंदीकरण, कृत्रिम भूजल पुनर्भरण विहिरी (रिचार्ज शाफ्ट), पर्जन्यजल संधारण, सूक्ष्म सिंचन, जलअर्थसंकल्प (वॉटर बजेटिंग), जलकार्यक्षम शेती तसेच जलतारा यांसारख्या उपक्रमांमुळे जलसंवर्धनाला मोठी चालना मिळत आहे.
वनहक्क कायदा (FRA) अंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या जमिनींवर मृदा व जलसंधारणाची कामे करून त्या जमिनी उत्पादक आणि शाश्वत करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांबरोबरच भूजल पुनर्भरण, पर्जन्यजल संधारण, पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि जलउपलब्धता वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
कॅच द रेन (Catch the Rain) अभियानाचा मुख्य उद्देश पावसाच्या प्रत्येक थेंबाचे स्थानिक पातळीवर संवर्धन करून जलसुरक्षा मजबूत करणे हा असून, त्यासाठी शासन, ग्रामपंचायती, विविध विभाग, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे. लोकसहभागाच्या बळावर जिल्ह्यात जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे.
या उपक्रमाची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या National Water Mission अंतर्गत आयोजित ५५ व्या Water Series Webinar मध्ये वक्ते म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी “Best Practices of Water Management” या विषयावर आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारमध्ये ‘Catch the Rain’ अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध जलसंधारण उपक्रमांचे सादरीकरण केले होते.
या सर्व उपक्रमांची प्रधानमंत्री मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये दखल घेतली. त्यांनी सांगितले की, ‘मन की बात’च्या गेल्या भागात मी तुमच्याशी ‘कॅच द रेन’ पावसाचं पाणी अडवण्याच्या मोहिमेविषयी चर्चा केली होती. पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याच्या या मोहिमेला लोकचळवळ बनवण्याचं आवाहन मी केलं होतं, असं मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी काय-काय म्हणाले?
‘कॅच द रेन’चा संदेश अतिशय सोपा आहे – जिथे पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, पाणी तिथेच साठवा. म्हणूनच 4 जुलैपासून देशभरात एक विशेष मोहीम राबवली जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याचं संकलन, भूजल पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला नवी गती दिली जात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“मला अत्यंत आनंद होत आहे की, गावं असोत की शहरं, पंचायती असोत की सामाजिक संस्था – सर्वत्र लोकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आहे. कुठे जुन्या तलावांमधील गाळ काढला जात आहे, तर कुठे विहिरी आणि बारवांना पुन्हा नवसंजीवनी दिली जात आहे. बंद पडलेले बोअरवेल-नलकूप आता भूजल पुनर्भरण करण्याचं माध्यम बनत आहेत”, असं मोदी म्हणाले.
मोदींनी नाशिकचा केला उल्लेख
“मध्य प्रदेशातील सिंधी जिल्ह्यात सुमारे दीड हजार तलाव निर्माण करण्यात आले आहेत. नरसिंगपूरमध्ये ‘अमृत सरोवरं’ विकसित करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंद्यालमध्ये सर्व ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्या असून, तेथील जुन्या तलावांचं पुनरुज्जीवन करून त्यांचा पुन्हा उपयोग सुरू करण्यात आला आहे”, अशी माहिती मोदींनी दिली.
आपली शहरही मागे नाहीत. छत्तीसगडमधील कोरबा, ओदिशामधील भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशातील विजयनगरम इथेही या अभियानाचे उत्साहवर्धक परिणाम दिसून येत आहेत. आपणही आपल्या परिसरातील एखाद्या तलावाची, विहिरीची किंवा बारवाची जबाबदारी स्वीकारूया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा निश्चय करूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब हा येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याची सर्वात मोठी पुंजी ठरेल, असा दावा मोदींनी केला.
पावसाचे पाणी जतन करण्यासाठी सुरू असलेल्या Catch the Rain अभियानात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. गाव, शहर, पंचायत आणि स्वयंसेवी संस्था जलसंधारण, भूजल पुनर्भरण, तलाव पुनरुज्जीवन आणि वृक्षलागवडीत सहभागी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा