Pune baramati bike truck accident one dead another seriously injured; बाईक घसरली, थेट ट्रकखाली गेली; सख्या भावांचा बारामतीत भीषण अपघात, एकाचा जीव गेला, दुसऱ्याची मृत्यूशी झुंज
Pune baramati bike truck accident one dead another seriously injured; बाईक घसरली, थेट ट्रकखाली गेली; सख्या भावांचा बारामतीत भीषण अपघात, एकाचा जीव गेला, दुसऱ्याची मृत्यूशी झुंज
दीपक पडकर, बारामती : बारामती तालुक्यातील सुपे–चौफुला मार्गावर भीषण अपघात झाला आहे. अहिल्याबाई चौकात आज दुपारी झालेल्या या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला. मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सख्खा भाऊ शुभम दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ बारामतीत तालुक्यातील मोरगाव येथील शाळेतून दुचाकी (एमएच ४२ ई १८७८) वरून सुपे येथील आपल्या घराकडे येत होते. अहिल्याबाई चौकातून पुढे वळण घेत असताना दुचाकीचा तोल जाऊन ती घसरली. त्याचवेळी मोरगावच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक (एमएच १० सीआर ४१९९) जवळ आल्याने दुचाकी ट्रकच्या चाकाखाली गेली.
या भीषण अपघातात सोमनाथ ठोंबरे याचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम ठोंबरे गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करून पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, घरातील तरण्याबांड तरुणाला गमावल्याने ठोंबरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसंच दुसरा मुलगा शुभम ठोंबरे याची मृत्यूशी झुंज सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा