Headlines

Shagufta Ali : 26 वर्षाचं रिलेशनशिप, बॉयफ्रेंडचं अकाली निधन; सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग, म्हणाली, ‘मी खूप रडायचे’


Shagufta Ali On Her Relationship : लोकप्रिय अभिनेत्री शगुफ्ता अली यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

Shagufta Ali On Her Relationship And Boyfriend Death
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – शगुफ्ता अली या मनोरंजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील आपल्या दमदार अभिनयानं चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, या अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही वेदनादायी आणि कठीण प्रसंगांनाही सामोरं जावं लागलं आहे. शगुफ्ता अली २६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होत्या. पण, त्यांच्या बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला. याबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

शगुफ्ता अली यांचं वय आता ५९ असून अद्याप लग्न का नाही केलं? असं एका मुलाखतीदरम्यान विचारलं असता शगुफ्ता अली म्हणाल्या की, ‘ज्याच्यासोबत लग्न करायचं होतं, तो आता या जगात नाही. २०११ मध्ये त्यांचं अल्सरमुळे निधन झालं. आमचं २६ वर्षाचं रिलेशनशिप होतं.’
Maharashtra TimesPrashant Damle : आजकाल बाल्कनीचा प्रेक्षकवर्ग नाही, 500 रुपयांच्यावर आम्हाला जाता येत नाही; नाटकाच्या तिकीट दराबद्दल स्पष्टच बोलले प्रशांत दामले
२६ वर्षाचं रिलेशनशिप असून लग्न का नाही केलं असं विचारलं असता शगुफ्ता म्हणाल्या की, ‘ज्यावेळी आम्ही लग्नाबद्दल ठरवायचो तेव्हा काही ना काही अडचणी यायच्या. त्यानंतर मी कुणाच्या प्रेमातच पडले नाही आणि लग्न तर कुणासोबत करायचं नव्हतं.’
Maharashtra TimesDharmendra Pradhan Resignation : आता मागे हटायचं नाही! धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मराठी कलाकार खुश, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

शगुफ्ता अली यांनी सांगितला प्रसंग

पुढे, बॉयफ्रेंडच्या निधनाचा प्रसंग सांगताना शगुफ्ता म्हणाल्या की, ‘त्यांना अल्सर झालेला आणि सगळं अचानक झालं. सगळं काही सुरळीत चाललं होतं. ते लंडनला दोन महिने होते आणि त्यानंतर मुंबईला आले. त्यांनी आणि त्यांच्या मित्राने मिळून हॉटेल सुरू केलेलं. सगळं काही व्यवस्थित झालं की, त्याच वर्षाच्या अखेरीस आम्ही लग्न करायचं ठरवलेलं. ऑगस्टमध्ये ते मुंबईत आले आणि सप्टेंबरमध्ये त्यांना अल्सर झाला. तीन महिने त्यांना त्रास झाला. अनेक उपचार केले. चौथ्यांदा इलाज केला तेव्हा पूर्णपणे ठीक झाले होते. ३१ डिसेंबरच्या रात्री कुटुंबियांना हॉस्पिटलच्या खाली सोडायला आले. त्याच रात्री झोपेत त्यांचा मृत्यू झाला.’

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

‘त्यांच्या निधनानंतर मी डिप्रेशनमध्ये नव्हते गेले, पण मी खूप रडायचे. माझी आई माझ्यासोबत होती. ती माझा आधारस्तंभ आहे. त्यातही माझे काही मित्र म्हणाले की, ‘काय ही नाटकं करते’ मी म्हटलं धन्यवाद! मला माझं-माझं राहू दे. त्यानंतर मी अनेक लोकांपासून लांब राहिले.’ असं शगुफ्ता यांनी शेवटी सांगितलं. ‘सिद्धार्थ कन्नन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शगुफ्ता अली बोलत होत्या.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा