Headlines

सुबोध भावे साकारतोय ‘ब्रह्मचैतन्य’, कोण होते साताऱ्यातले गोंदवलेकर महाराज?


Subodh Bhave in Gondavalekar Maharaj Role:अभिनेता सुबोध भावे सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो ‘श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’ यांच्या भूमिकेत दिसत आहे.

Subodh Bhave in Gondavalekar Maharaj Role
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा एका अध्यात्मिक आणि ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रीलस्टार अथर्व सुदामे याच्या शॉर्ट फिल्ममध्ये सुबोध भावे ‘श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ‘ यांची भूमिका साकारताना दिसत आहे. या शॉर्ट फिल्मचा पहिला लूक आणि त्यामागील भावूक प्रवास अथर्व सुदामेने सोशल मीडियावर शेअर केला असून, सुबोध भावेचा गोंदवलेकर महाराजांच्या रूपातील लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी सुबोधला गोंदवलेकर महाराजांच्या रुपात पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

ब्रह्मचैतन्य असं अर्थवच्या या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. याचा एक टीझर समोर आल्यानंतर आता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांबद्दल सोशल मीडियावर बोललं जात आहे.

कोण होते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज?

महाराष्ट्राच्या या पावन भूमीला महान संतपरंपरा लाभली आहे. त्यापैकीच एक श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज . सातारा जिल्ह्यातल्या ‘गोंदवले बुद्रुक’ या गावी माघ शुद्ध द्वादशी (१९ फेब्रुवारी १८४५) रोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव गणपती रावजी घुगरदवे असं होतं. लहानपणापासूनच त्यांच्या अंगी भगवद्भक्ती, परोपकार आणि तीव्र गुरुध्यासाचे संस्कार होते. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी गुरूच्या शोधात त्यांनी गृहत्याग केला आणि भारतभर भ्रमंती केली. या प्रवासात अनेक साधू-संतांच्या भेटी घेतल्यानंतर, येहळेगावचे श्री तुकामाई यांनी त्यांना अनुग्रह दिला आणि ‘ब्रह्मचैतन्य’ हे नाव दिलं. गुरुआज्ञेनं त्यांनी “श्रीराम जयराम जयजयराम” या त्रयोदशाक्षरी मंत्राचा प्रसार करण्याचं व्रत हाती घेतलं होतं.

Maharashtra TimesAga Aai Aaho Aai Review: सासू-सून ड्रामा नव्हे बरंच काही; कशी आहे हृता दुर्गुळेची ‘अगं आई, अहो आई’ वेब सीरिज?
महाराजांनी दिक्षा घेतल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारला. पण त्यांच्या पारमार्थिक जीवनावर त्याचा परिणाम झाला नाही. इ. स. १८७६ व १८९६ या सालांतील दुष्काळादरम्यान गोंदवल्यातील व आसपासच्या खेड्यातील लोकांसाठी त्यांनी आपली धान्याची कोठार खुली केली. गरिबांना, वृद्धांना मोफत अन्नदान केलं. म्हसवड गावात भरणाऱ्या बाजारात कसायांकडून गायी विकत घेऊन त्यांना जीवदान तर दिलंच पण त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांच्यासाठी गोशाळा बांधली, असं सांगितलं जातं. संसार सोडून जंगलात जाण्याची अजिबात गरज नाही, असं महाराज ठामपणे सांगत. प्रपंचात आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडा..असं त्यांचा विचार होता.

मार्गशीर्ष वद्य दशमी (२२ डिसेंबर १९१३) रोजी महाराजांनी गोंदवले इथं देह ठेवला. आज गोंदवले हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून, हजारो साधकांसाठी शांतता आणि समाधानाचा अक्षय स्रोत बनलं आहे.

Maharashtra TimesAtul Kulkarni post: आजच्या परिस्थितीला आम्ही कारणीभूत आहोत, जेन झींना फुल्ल पाठिंबा देत अभिनेते अतुल कुलकर्णींची आणखी एक जळजळीत पोस्टदरम्यान, सुबोध भावेनं यापूर्वी ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य : एक युगपुरुष’, ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ आणि ‘हर हर महादेव’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चरित्रपटांमध्ये ऐतिहासिक व महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच तो ‘नीम करोली बाबा’ यांच्यावर आधारित प्रोजेक्टमध्येही दिसला होता.