Headlines

प. आशियातील तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम


सेन्सेक्स 364 तर निफ्टी 126.66 अंकांनी नुकसानीत : मिडकॅप, स्मॉलकॅपमधील समभाग घसरणीत

वृत्तसंस्था/मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. दरम्यान पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या दरातील तेजीमुळे नकारात्मक परिणाम होत आहेत. याचा परिणाम म्हणून भारतीय शेअर घसरणीसह बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 363.66 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 76,391.39 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 126.65 अंकांनी घसरुन निर्देशांक 23,869.60 वर बंद झाला आहे.

मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये 1 टक्क्यांनी घसरण राहिली. निफ्टी पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या दरातील तेजीमुळे कमजोर झाला आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे, कच्च्या तेलाच्या दरातील वाढीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. तर आशियाई बाजारांमधील तेजी आणि जाहीर होणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहिले आहे.

निफ्टीमधील निर्देशांकात अदानी एंटरप्रायझेस, नेस्ले इंडिया आणि श्रीराम फायनान्सच्या शेअर्सना सर्वाधिक फटका बसला. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी रियल्टी, निफ्टी केमिकल आणि निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. त्याच वेळी, निफ्टी मीडिया आणि निफ्टी ऑटोने इतर क्षेत्रांपेक्षा चांगली कामगिरी केली. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेस सर्वाधिक घसरलेला शेअर ठरला. त्याच वेळी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी सर्वाधिक वाढलेला शेअर ठरला. क्षेत्रीय निर्देशांकातील सर्वात मोठी घसरण केमिकल आणि रिअल्टी क्षेत्रात दिसून आली.

तज्ञांच्या नजरेतून

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळ पोहोचल्या आहेत. यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याबद्दल चिंता वाढली आहे आणि गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. ते म्हणतात की, बाजार आता वाढत्या महागाईचा धोका आणि त्याचा कॉर्पोरेट नफ्यावर होणारा परिणाम यांचे मूल्यांकन करत आहे. यामुळे आगामी काळात जागतिक घडामोडींचा कल कोणत्या दिशेने राहणार यावर बाजाराची दिशा निश्चित होणार असल्याचे संकेत आहेत.

  • महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 3228
  • टीसीएस               2242
  • इटरनल                 286
  • बजाज फिनसर्व्ह 1889
  • एचसीएल टेक 1244
  • कोटक महिंद्रा 383
  • सनफार्मा 1954
  • अल्ट्राटेक सिमेंट 11930
  • हिंदुस्थान युनि 2160
  • आयटीसी         281
  • पॉवरग्रिड कॉर्प 289
  • हिरोमोटो        5174
  • एसबीआय लाईफ 1852
  • बजाज ऑटो 11278
  • आयशर मोटर्स 7719
  • हिंडाल्को      956
  • फेडरल बँक  354
  • श्री सिमेंट      26863
  • हॅवेल्स इंडिया 1205
  • टीव्हीएस मोटर्स 3917
  • विप्रो                 174
  • मॅक्स हेल्थकेअर 1085
  • वरुण बेव्हरेज 459

  • अदानी पोर्ट        1778
  • बजाज फायनान्स 1039
  • इटरग्लोब एव्हीआय 5023
  • अॅक्सिस बँक 1222
  • स्टेट बँक           1012
  • टाटा स्टील          184
  • मारुती सुझुकी 13396
  • रिलायन्स इंडस्ट्रीज 1275
  • भारती एअरटेल 1931
  • एशियन पेन्ट्स 2669
  • एचडीएफसी बँक 748
  • लार्सन-टुब्रो        3793
  • आयसीआयसीआय 1433
  • एनटीपीसी 348
  • टेक महिंद्रा 1554
  • ट्रेन्ट           2874
  • भारत इलेक्ट 405
  • टायटन       4696



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत