Sumeet Raghavan Post : सुमीत राघवननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सध्या देशभरात दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाची चर्चा सुरू आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी जखमी झाले. आता मुंबईतही आंदोलन सुरू झालं आहे. त्यावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता सुमीत राघवननंही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याप्रकरणी भाष्य केलं आहे.
सुमीत राघवनची पोस्ट
सुमीत राघवननं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत, प्रश्न विचारायचे नाहीत, प्रश्न विचारले तर देशाचं नाव खराब होतं, असं म्हटलं आहे. सुमीत म्हणाला की, ‘प्रश्न विचारू नका. जे चाललंय ते चांगलंच चाललंय. प्रश्न विचराले की देशाचं नाव खराब होतं. आमच्या राज्यात महाराष्ट्रात तर पाहिलं आम्ही की, प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान होतो. मग कोणा राजकीय नेत्याच्या गुंडांनी डॉक्टरांना बेदम मारलं तरी. जे फक्त ऐकलेलं नाहीये तर व्हिडिओमध्ये ते घडताना दिसतंयसुद्धा पण, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही. ब्रिज तुटत आहेत, २००५ मध्ये पूर आला होता. आज २०२६ मध्ये सुद्धा २१ वर्षांनंतर पूर येतो आणि वसई, विरार नालासोपारासारख्या ठिकाणी ३ दिवस लाईट नसते. तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही.’ Ranjana Deshmukh : अपघातानं अपंगत्व आलं, तरीही नाही मानली हार; रंजना देशमुख यांनी व्हिलचेअरवर बसून नाटकात केलेलं काम ‘प्रश्न विचारले की हात उचला जातो. बघताय ना तुम्ही सोशल मीडियावर सगळीकडे तेच सुरू आहे. हे काय चाललंय हा, काय सुरू आहे. ही लोकशाही आहे की नाही? काय चूक आहे त्या मुलांची? हे चांगल्या पद्धतीने हाताळता आलं असतं ना, जेव्हा तुम्हाला अंदाजा आला होता, तेव्हा संवाद का सादला गेला नाही. इतकं कठीण होतं का? किती मारलं आहे मुलांना. कोण आहेत ही मुलं? आपल्या देशाची आहेत ना! तुम्हीसुद्धा देशाचेच आहात ना! मग हे काय सुरू आहे? मला खरंच कळत नाहीये की, यावर काय बोलावं. पण हे इतकं चुकीचं कसं होऊ शकतं.’ ‘आमच्या महाराष्ट्राचे एक नेते म्हणाले हे दहशतवादी आहेत. ही मुलं दहशतवादी आहेत का? ही मुलं आपलं भविष्य आहेत. कृपया तुमच्या खुर्चीवरुन उठा आणि संवाद साधा. त्यांच्या खांद्यावर हात ठेवा आणि त्यांना आत्मविश्वास द्या. घरातील मोठी माणसं त्यांच्या मुलांशी प्रेमानं संवाद साधतात. कृपया त्यांच्याशी संवाद साधा आणि राहिला प्रश्न या मुलांचा तर, त्यांना सलाम. काय ताकद आहे. मी खूप लहान कलाकार आहे आणि सामान्य नागरिक आहे पण मी तुमच्याबरोबर आहे.’ असं सुमीतनं शेवटी म्हटलंय.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा