Maharashtrachi Hasyajatra Fame Actor : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात आणि प्रियदर्शिनी इंदलकर शिवाजी पार्क येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – नीट पेपरफुटीविरोधात कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन जवळपास दीड महिन्यापासून सुरू असून, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यासाठी शेकडो विद्यार्थी एकत्र आले आहेत. २० जुलै रोजी विद्यार्थ्यांनी संसदेच्या दिशेनं मोर्चा काढला. पण मोठ्या पोलीस दलानं विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. यात विद्यार्थ्यांसह पोलीस अधिकारीही जखमी झाले. यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही कलाकार दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच काल दादर येथी शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं. या आंदोलनालाही कलाकारांचा पाठिंबा मिळाला. या आंदोलनात ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ फेम प्रियदर्शिनी इंदलकर आणि वनिता खरात सहभागी झाले होते. वनितानं यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
वनिता खरातची पोस्ट
वनिता खरातनं सोशल मीडियावर आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, ‘जय भारत! जय संविधान! काल NEET प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात सहभागी झाले. आपण जिथे असू, तिथून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण आज प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा, मेहनतीचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा आहे.’
CJP Protest | विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि किसान मोर्चातील नेत्यावर हल्ला, शेतकरी संघटना आक्रमक
‘लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही, तो प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्या संविधानानं आपल्याला तो अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून भविष्य घडत नाही; त्यांचा आवाज ऐकून राष्ट्र घडतं. आवाज द्या. प्रश्न विचारा. न्यायाची साथ द्या.’ असं वनितानं शेवटी म्हटलं आहे.
प्रियदर्शिनी इंदलकरची पोस्ट
तसेच अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरनंही आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘सर्वप्रथम, आजच्या कमी लेखल्या जाणाऱ्या तरुणाईची ऊर्जा थक्क करणारी आहे!!! आणि त्यांची क्रिएटिव्हिटीही तशीच आहे! शासनाला मतभेद दर्शवण्यासाठी आणि बदलाची तीव्र मागणी करण्यासाठी हे खरे लोकशाहीचे प्रयत्न होते. मला खूप अभिमान आहे की मी या पिढीची आहे!’
‘मी जंतर मंतर येथे सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तिथे गेले होते. २० जुलै रोजी जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांना ज्या हिंसेचा सामना करावा लागला, त्याचा मी तीव्र निषेध करते. मी तिथे गेले कारण, मला वाटतं की प्रश्न विचारणं, आपल्या हक्कांचा वापर करणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला या आंदोलनाचा एक भाग व्हायचं होतं, केवळ सोशल मीडियावर नाही. पण, मला सांगितल्या प्रमाणे खोटे विद्यार्थी, खोटा हेतू, चुकीच्या समजुती इत्यादींची भीतीही वाटत होती. ज्या कोणाला या आंदोलनांच्या हेतूंबद्दल शंका असेल, त्यांनी कृपया एकदा आंदोलनात सहभागी व्हावं आणि निर्णय घ्यावा.’ लोकशाहीचा आदर करायलाच हवा, आणि अन्यायावर वाचा फोडायलाच हवी !’ असं अभिनेत्रीनं शेवटी म्हटलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा