त्याचवेळी, गेल्या काही दिवसांपासूनच्या तेजी-मंदीनंतर सोने आणि चांदीच्या बाजारात खरेदीचा कल परतला असून सलग तिसऱ्या दिवशी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत हिरवळ दिसून आली आहे.पश्चिम आशियातील वाढत्या तणाव निवळण्याच्या आशेने गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव घेतल्याने आणि व्याज दरांबाबत नवीन संकेतांसाठी पुढील आठवड्यातील फेडरल रिझर्व्हच्या धोरण बैठकीच्या प्रतीक्षेत बुधवार, 22 जुलै रोजी जागतिक बाजारात सोन्याच्या दरात आणखी वाढ झाली आणि जवळपास 2 आठवड्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले.
Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; जेनेरिक औषध टॅरिफबाबत मोठी घोषणा, भारतीय फार्मा कंपन्यांची धाकधूक वाढली
सोने-चांदीच्या दरात वाढीचा कल सुरुच
मध्यपूर्वेतील तणाव कायम असूनही किमतीतील घसरणीचा फायदा घेत खरेदी करणाऱ्यांनी आधार दिल्याने सोन्याच्या दरातील वाढ कायम राहिली. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि मागणीतील वाढीचा मागोवा घेत बुधवार, 22 जुलै रोजी देशांतर्गत वायदा बाजारात, MCX वर, सोन्याचे ऑगस्ट फ्युचर्स आदल्या दिवसाच्या 1,42,883 रुपयांवरून सकाळी 9:15 वाजता 1697 रुपयांनी वाढून 1,44,580 रुपयांवर उसळले तर, चांदीचे फ्युचर्स आदल्या दिवसाच्या 2,23,779 रुपयांच्या क्लोजवरून 2,600 रुपयांच्या वाढीसह 2,26,380 रुपयांवर पोहोचले.
त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात COMEX वर सोन्याचे फ्युचर्स 1.17 टक्क्यांनी वधारले आणि 4,124 डॉलर्सवर पोहोचले, जो गोल्डचा दोन आठवड्यातील उच्चांक ठरला. याशिवाय चांदीच्या दरातही वाढी झाली आणि COMEX वर 1.70% वाढून प्रति औंस 60.115 डॉलर झाला.
सोने-चांदीच्या अचानक दरवाढीचे कारण काय?
सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढू लागल्यामुळे किमती फास्ट ट्रॅकवर परतल्या आहेत. येमेनच्या इराण-समर्थित हुती बंडखोरांच्या धमक्यांनंतर सौदी अरेबियाहून आशियाकडे जाणाऱ्या दोन तेलवाहू जहाजांना लाल समुद्रात आपला मार्ग बदलायला भाग पडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पश्चिम आशियातील युद्धाची परिस्थिती आखि बिकट होण्याबाबत चिंता निर्माण झाली. अशाप्रकारच्या या हालचालींमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याबद्दल चिंता पुन्हा वाढली आणि गुंतवणूकदारांना सोन्यासारख्या पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक मालमत्तांकडे वळण्यास प्रवृत्त केले.
LTCG Tax Removal Explained: लाँग टर्म भांडवली नफा करात दिलासा नाही! शेअर बाजाराचा ‘व्हिलन’ LTCG कर काढून टाकल्यास तुमचा किती फायदा?
मात्र, इराणने वाटाघाटी सुलभ करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानकडे साद घातली आणि राजनैतिक प्रयत्न सुरू असले तरी, तणाव आणखी वाढण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात सावध पवित्रा घेतला जात आहे. जागतिक विकास किंवा वित्तीय बाजारांना धोका वाढल्यास आपल्या गुंतवणुकीचे मूल्य टिकवून ठेवण्याचे साधन म्हणून सोन्याकडे वळतात त्यामुळे, भू-राजकीय अनिश्चिततेच्या काळात सोन्याला सामान्यतः फायदा होतो, पण गेल्या काही महिन्यांत उलट चित्र पाहायला मिळालं आहे.

