Headlines

स्वानंदी सरदेसाईने बनल्या विस्मरणात गेलेल्या पावसाळी रानभाज्या, भारंगी टाकळाची भाजी कशी बनवावी जाणून घ्या रेसिपी – youtube influencer swanandi sardesai made rainy season special takla bhaji recipe in marathi


पावसाळ्यात कोकणात मिळणाऱ्या टाकळा आणि भारंगी या रानभाज्यांची पारंपरिक गोळ्याची भाजी चवीला अप्रतिम आणि पौष्टिक असते.स्वानंदी सरदेसाईने शेअर केलेली ही खास कोकणी रेसिपी नाचणीची भाकरी, भात किंवा दह्यासोबत छान लागते. या पावसाळ्यात निसर्गाची ही देणगी असलेली रानभाजी नक्की करून पाहा.

How to Make Takla Bhaji
फोटो सौजन्य :- @Swanandi Sardesai
पावसाळा सुरू झाला की कोकणच्या हिरव्यागार डोंगररांगा, शेताच्या बांधावर आणि रानावनात अनेक प्रकारच्या रानभाज्या उगवून येतात. या रानभाज्या म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली एक अनमोल देणगीच आहे. कोणतीही लागवड न करता आपोआप उगवणाऱ्या या भाज्या चवीला वेगळ्या असतात आणि त्यामध्ये अनेक पोषक घटकही आढळतात.कोकणातील अनेक घरांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत या रानभाज्यांचा आवर्जून वापर केला जातो. कुरडू, खोडशी, थरमळ, कोचिंदा कांदा, टाकळा, भारंगी अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या या काळात उपलब्ध होतात.

पूर्वीपासूनच ग्रामीण भागातील लोक या भाज्यांचा आहारात समावेश करत आले आहेत. ऋतूनुसार मिळणाऱ्या या भाज्या शरीराला त्या काळात आवश्यक असलेले पोषण देतात. अशाच पारंपरिक आणि पौष्टिक रानभाज्यांपैकी एक म्हणजे टाकळा आणि भारंगी. या दोन्ही भाज्यांचा वापर करून तयार केलेली भारंगी-टाकळ्याची गोळ्याची भाजी ही कोकणी पद्धतीची खास रेसिपी आहे. या भाजीची चव वेगळी असून ती नाचणीची भाकरी, भात किंवा दह्यासोबत अतिशय छान लागते. स्वानंदी सरदेसाईने तिच्या सोशल मीडियावर ही रेसिपी शेअर केली आहे. या पावसाळ्यात तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करू शकता.(फोटो सौजन्य :- @Swanandi Sardesai)

रानातून टाकळा आणि भारंगीची निवड

रानातून टाकळा आणि भारंगीची निवड

रानभाजी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वनस्पतीची ओळख करणे. कारण काही रानभाज्या दिसायला सारख्या असल्या तरी त्या खाण्यायोग्य नसतात. टाकळ्याची भाजी निवडताना त्याची पाने लक्षपूर्वक पाहावी लागतात. खाण्यायोग्य टाकळ्याची पाने थोडी गोलसर असतात. तर काही प्रकारच्या टाकळ्याची पाने टोकदार आणि लांबट असतात, ती खाण्यास योग्य नसतात.भारंगीची पाने आणि फुले देखील या रेसिपीसाठी वापरली जातात. भारंगीला निळसर रंगाची सुंदर फुले येतात. त्याची कोवळी पाने आणि फुले भाजीसाठी उत्तम असतात.

भारंगी-टाकळ्याची गोळ्याची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य

भारंगी-टाकळ्याची गोळ्याची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य
  • भारंगीच्या गोळ्यांसाठी:
  • भारंगीची कोवळी पाने – २ वाट्या
  • भारंगीची फुले – थोडी
  • बेसन (डाळीचे पीठ) – आवश्यकतेनुसार
  • हळद – १/२ चमचा
  • लाल तिखट – चवीनुसार
  • हिंग – चिमूटभर
  • मीठ – चवीनुसार

टाकळ्याच्या भाजीसाठी

टाकळ्याच्या भाजीसाठी
  • टाकळ्याची चिरलेली पाने – २ वाट्या
  • कांदा – १ बारीक चिरलेला
  • लसूण – ५ ते ६ पाकळ्या
  • ओले खोबरे – २ चमचे
  • मोहरी – १ चमचा
  • हिंग – चिमूटभर
  • हळद – १/२ चमचा
  • लाल तिखट – चवीनुसार
  • तेल – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार

टाकळा आणि भारंगीची गोळ्याची भाजी

भारंगीचे गोळे तयार करण्याची पद्धत

भारंगीचे गोळे तयार करण्याची पद्धत

सर्वप्रथम भारंगीची कोवळी पाने आणि फुले स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यानंतर ती बारीक चिरून घ्यावीत. भारंगीची पाने थोडी अडसर किंवा कडवटपणा देऊ शकतात, त्यामुळे ती आधी वाफवून घेणे चांगले.चिरलेली भारंगीची पाने चाळणीत ठेवून काही मिनिटे वाफवून घ्यावीत. पाने अर्धवट शिजल्यानंतर ती एका भांड्यात काढून घ्यावीत.आता या वाफवलेल्या भारंगीमध्ये बेसन घालावे. त्यामध्ये हळद, लाल तिखट, हिंग आणि मीठ घालून मिश्रण तयार करावे.

मोठे गोळे करू नका

मोठे गोळे करू नका

गोळे करण्यासाठी पीठ खूप घट्ट करू नये. थोडे सैलसर पीठ ठेवावे, जेणेकरून वाफवल्यानंतर गोळे मऊ राहतील. जर पीठ खूप घट्ट झाले तर गोळे आतून नीट शिजत नाहीत.हाताला थोडे तेल लावून या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करावेत. हे गोळे स्टीमरमध्ये किंवा चाळणीवर ठेवून ५ ते ७ मिनिटे वाफवून घ्यावेत.वाफवल्यानंतर भारंगीचे मऊ आणि स्वादिष्ट गोळे तयार होतील.

टाकळ्याची भाजी बनवण्याची पद्धत

टाकळ्याची भाजी बनवण्याची पद्धत

आता कढईमध्ये तेल गरम करावे. त्यामध्ये मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यानंतर हिंग, हळद आणि लाल तिखट घालावे.यानंतर बारीक चिरलेला लसूण आणि कांदा घालून छान परतून घ्यावा. कांदा हलका सोनेरी झाला की त्यामध्ये चिरलेली टाकळ्याची पाने घालावीत.भाजीमध्ये थोडे पाणी घालून झाकण ठेवावे आणि ती व्यवस्थित शिजू द्यावी. टाकळ्याची पाने मऊ झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि ओले खोबरे घालावे.या भाजीमध्ये काही जण डाळीचे पीठ किंवा तांदळाचा रवा घालतात, ज्यामुळे भाजीला घट्टपणा येतो. मात्र पारंपरिक पद्धतीने ही भाजी साध्या स्वरूपातही खूप चविष्ट लागते.

शेवटचा टप्पा – गोळे भाजीमध्ये सोडणे

शेवटचा टप्पा – गोळे भाजीमध्ये सोडणे

टाकळ्याची भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये आधी तयार केलेले भारंगीचे वाफवलेले गोळे हलक्या हाताने सोडावेत.भाजीला एक उकळी आली की गॅस बंद करावा. अशा प्रकारे तयार होते कोकणातील खास भारंगी-टाकळ्याची गोळ्याची भाजी.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा