CJP Delhi Protest: जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी भारत बानाईत याच्यावर लाठीहल्ला केल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

संसदेवर सोमवारी सीजेपीच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवले. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेढलेल्या आंदोलनकर्त्याला लाठ्यांनी मारहाण होत असतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. यात ज्याला मारहाण होत आहे तो युवक वारंवार ‘मारो सर’ असे म्हणत असल्याचे दिसत आहे. या आंदोलनकर्त्याची ओळख नागपूरच्या भरत बानाईत अशी झाली आहे. ‘या देशात लोकशाही संपली असल्यामुळे माझ्या जगण्यालाच काही अर्थ नाही. त्यामुळे मला लाठीने मारण्यापेक्षा थेट गोळी घाला’, असा संतापही त्या तरुणाने आंदोलनातील मारहाणीदरम्यान व्यक्त केला. या मारहाणीनंतर भारतचे वडील कमलाकर व आई वनिता बानाईत यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘माझ्या मुलाला ज्यांनी मारहाण केली ते त्यांच्या मुलांना तशी मारहाण करू शकतात का. देशातील कोणत्याही मंत्र्यांच्या मुलांना अशी बेदम मारहाण होऊ शकते का’, असा सवालही त्यांनी केला आहे.
Aditya Thackeray: फेसलेस आंदोलनामुळेच भाजपच्या तोंडाला फेस; आदित्य ठाकरेंचा CM फडणवीसांवर पलटवार, मारहाण केलेल्या आंदोलकांना आवाहन
सुरुवातीला हा व्हिडीओ बघताना, पोलिसांकडून फक्त दोन-चारच काठ्या मारल्या गेल्या असतील, असे तेव्हा मला वाटले. मात्र, जेव्हा मी पुन्हा तो व्हिडीओ बारकाईने बघितला, तेव्हा मला प्रचंड त्रास झाला. अशाप्रकारे पोलिसांनी घेरत माझ्या मुलाला बेदम मारहाण केली आहे, त्याचे डोके फोडले आहे आणि पूर्ण शरीरावर गंभीर मार दिला आहे. या पोलिसांवर तत्काळ कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मुलाशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणाबाबत विचारले असता, त्याच्याशी बोलणे झाले असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. संपूर्ण शरीरभर मार लागल्याने तो प्रचंड वेदनेत आहे, असे भारतच्या आई वनिता यांनी स्पष्ट केले.
Devendra Fadnavis: राजकीय पोळी भाजताहेत! दिल्ली आंदोलनावरुन मुख्यमंत्र्यांचा आरोप; पोलिस योग्य असल्याचा दावा
या घटनेनंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी बानाईत कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी गुडधे यांनी भारतशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत संवाद साधला. देशातील प्रत्येक विद्यार्थी व तरुणाच्या न्यायाच्या लढ्यात काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले.

