Headlines

Angad Mhaskar Second Marriage With Neha Phadke ; Angad Mhaskar : स्टार प्रवाहचा नौटंकी खलनायक दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, काही दिवसांपूर्वीच दिलेली प्रेमाची कबुली


Marathi Actor Second Wedding : अनेक मालिकांमध्ये खल भूमिका साकारुन घराघरात पोहचलेल्या अभिनेत्याने दुसरे लग्न केले आहे. त्याच्या लग्नाचे फोटो पाहून अनेक जण त्याचे अभिनंदन करत आहेत.

angad mhaskar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कलाकार मंडळींचे लग्न हा नेहमीच एक चर्चेचा विषय असतो. टीव्हीवर दिसणारे कलाकार वैयक्तिक आयुष्यात कसे आहेत किंवा त्यांचे खरे जोडीदार कसे असतील याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता भरपूर असते. विशेषतः खलनायकांच्या बाबतीत हे जास्त होतं कारण टीव्हीवर ते क्रूर दिसत असतात त्यामुळे खऱ्या आयुष्यातही ते तसेच असतील का हे लोकांना पाहायचं असतं त्यामुळे त्यांच्या सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष असतं. अशातच आता स्टार प्रवाहच्या एका लोकप्रिय खलनायकाबाबत एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे तो दुसऱ्यांना विवाहबद्ध झाला आहे.

Maharashtra TimesSuchitra Bandekar : त्या आजी आल्या, माझ्याकडे पैसे मागितले अन् गायब झाल्या! सुचित्रा बांदेकरांनी सांगितला मार्गशीर्षातल्या गुरुवारच्या व्रताचा किस्सा
हा खलनायक म्हणजे अभिनेता अंगद म्हसकर . अंगदने नुकतेच दुसरे लग्न केले. हे लग्न अगदी साधेपणाने पार पडले. या लग्नात कुटुंबातील मंडळी उपस्थित होते. नेहा फडके असे अंगदच्या पत्नीचे नाव आहे.खरंतर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर त्याने तिच्यासोबत फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. या फोटो सोबत फ्रॉम हेअर टू फोरेवर असं कॅप्शन ही होते. त्यांचा तो फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला.

Maharashtra TimesSimple Kaul : ‘हॉटेलमध्ये मला एकटीला भेटायला बोलावलं’, ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
आता अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो समोर आल्याने त्याच्यासाठी आनंद व्यक्त केला आहे. फोटोवर अनेक जण शुभेच्छा देत आहेत तसेच भावी आयुष्यासाठी आशीर्वादही देत आहे. अंगदने त्याचा इंस्टाग्राम स्टोरीवर लग्नाचे काही फोटो शेअर केले.

angad mhaskar post

अंगद म्हसकरची पोस्ट

अंगद म्हसकर हा अबोली या मालिकेत खलभूमिकेमध्ये दिसलेला. शिवाय स्टार प्रवाह वरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले या मालिकेतही त्याने महत्त्वाची भूमिका साकारलेली. अंगद बरेचदा खल भूमिकेत दिसतो. अंगदच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याचे पहिले लग्न अनन्यासोबत झाले होते.‌ त्या दोघांनाही मुलगाही आहे. पण काही कारणास्तव त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता तो त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे.

Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली

अंगदने मालिकांव्यतिरिक्त अनेक सुपरहिट सिनेमांमध्येही काम केले. मुंबई पुणे मुंबई, सविता दामोदर परांजपे यांसारख्या सिनेमात तो दिसला. याशिवाय सध्या तू सुभेदार गेस्ट हाऊस या सस्पेन्स नाटकांमध्ये काम करत आहे. या नाटकात त्याच्यासोबत सौरभ गोखले, दिनेश पोतदार, शंतनु मोघे, सना कुलकर्णी, कल्पक जोशी, मृण्मयी गोंधळेकर यांसारखे कलाकार आहेत. या नाटकाच्या टीमने सुद्धा अंगदला त्याच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी खास शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. जी त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर रिपोस्ट केलेली पाहायला मिळते.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा