Pune Ketan Agarwal Lohgad Murder Case accuse contacted contract killer watched Japanese videos before arrest Crime News;सिया-चेतन दोन तास जपानी व्हिडिओ पाहत बसलेले, तपासात लिंक सापडली, कंटेंट पाहून पोलिसांचा डोक्याला हात
Pune Ketan Agarwal Lohgad Murder Case accuse contacted contract killer watched Japanese videos before arrest Crime News;सिया-चेतन दोन तास जपानी व्हिडिओ पाहत बसलेले, तपासात लिंक सापडली, कंटेंट पाहून पोलिसांचा डोक्याला हात
Pune Crime : केतन अग्रवाल याची हत्या करण्यासाठी सिया-चेतनने एका ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’शी संपर्क साधला होता, मात्र बांधकाम व्यवसायात असलेल्या अग्रवाल कुटुंबाबद्दल माहिती मिळाल्यानंतर किलरने त्याची हत्या करण्यास नकार दिला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : लोहगड हत्या प्रकरणातील आरोपसिया गोयल हिने सहआरोपी असलेला तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून आपला होणारा पती केतन अग्रवाल याची हत्या करण्यासाठी एका ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’शी संपर्क साधला होता, तसेच अटक होण्यापूर्वी सिया आणि चेतन यांनी जवळपास दोन तास जपानी व्हिडिओ पाहिल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.
‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ची माघार
केतन अग्रवाल याची हत्या करण्यासाठी सिया-चेतनने एका ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’शी संपर्क साधला होता, मात्र बांधकाम व्यवसायात असलेल्या अग्रवाल कुटुंबाबद्दल माहिती मिळाल्यानंतर संबंधित किलरने त्याची हत्या करण्यास नकार दिला. तो मारेकरी घाबरला आणि त्याने हे काम स्वीकारण्यास नकार दिला, असा दावा पुणे पोलिसांनी केल्याचं वृत्त ‘भास्कर इंग्लिश’ वेबसाईटने दिलं आहे.
अटकेपूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी जवळपास दोन तास जपानी व्हिडिओ पाहिल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, पोलिस चौकशीदरम्यान शांत कसे राहावे, देहबोलीवर नियंत्रण कसे ठेवावे आणि प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत, याचे मार्गदर्शन या व्हिडिओंमध्ये करण्यात आले होते. दोन्ही आरोपींच्या ‘ब्राउझिंग हिस्ट्री’मध्ये या व्हिडिओंशी संबंधित लिंक्स सापडल्याची माहिती आहे.
लहान मुलासह पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतील CJP आंदोलनातील महिलेचा PM मोदी-फडणवीसांवर संताप
गुप्त विवाहाचं गुपित
पोलिसांच्या आरोपानुसार, १८ जून रोजी सिया आणि चेतन यांनी लोहगड किल्ल्यावरुन केतन अग्रवाल याला ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांना दोन फोटो सापडले आहेत. त्यात सिया आणि चेतन विवाह करताना दिसत आहेत. हे फोटो खरे आहेत की नाही, याची पोलीस पडताळणी करत आहेत. Marriage Without Divorce : तू उद्या मरणारेस, माझं काय? नवऱ्याला कॅन्सर होताच बायको सोडून गेली; घटस्फोटाविना दुसरा संसार; कोर्ट म्हणालं, अटक करा! तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघांनी २०२५ मध्ये राजस्थानमधील खाटू श्याम मंदिरात गुपचूप विवाह केल्याचा दावा केला जातो. या दाव्याची खातरजमा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने अलिकडेच त्या मंदिराला भेट दिली आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची न्यायालयीन कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवून ती २९ जुलैपर्यंत केली आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा