Headlines

Solapur Barshi Mother Killed her 10 Month Old Daughter then go to Police Station and Confesses; ‘आई, मला मारु नको, मी शिकून खूप मोठी होईन’; मोठ्या मुलीची विनवणी ऐकली, पण धाकटीला निर्दयपणे संपवलं


Solapur Crime News : सोलापूरच्या बार्शीत धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या छळाला कंटाळून 10 महिन्यांच्या मुलीची आईने हत्या केली. आरोपी महिलेनं स्वतः पोलिसांसमोर हजर होत कबुली दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Barshi Mother Killed Daughter
बार्शी आईने मुलीची हत्या केली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. जन्मदात्री आईनेच आपल्या 10 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा गळा आवळून खून करुन तिला पाण्याच्या बादलीत बुडविले. त्यानंतर तिने सहा वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहा वर्षाच्या मुलीनं आईला विनवणी केली, ‘आई मी चांगली शाळा शिकते, मला मारू नकोस’. त्यावेळी आईने मोठ्या मुलीला सोडलं आणि चिमुकल्या लेकराचा बळी घेतला आहे.

‘मी माझ्या मुलीला ठार केलंय’

जन्मदात्री आईने मृत झालेल्या 10 महिन्यांच्या बाळाला खांद्यावर घेऊन शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. ‘माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून, मी माझ्या मुलीला ठार केलं आहे. मला अटक करा’, ही वाक्य ऐकून बार्शी शहर पोलीस स्टेशनमधील पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी ताबडतोब मुलीला बार्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता, 10 महिन्याचं बाळ मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. पुजा योगेश खुर्दामळे (वय 26, मुळ रा. शिराढोण ता. कंधार जि. नांदेड, सध्या रा. शंभुराजे चौक अलीपूर रोड, बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर) असं आरोपी आईचं नाव असून तिच्या मोठ्या मुलीचं नाव तेजल योगेश खुर्दामळे (वय 6 वर्ष) आणि मृत लहान मुलगी शक्ती (वय 10 महिने) असं असल्याचे पोलिसांनी नोंद केली आहे.
Maharashtra TimesNavi Mumbai : सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; चुकीच्या इंजेक्शनमुळे बळी गेल्याचा आरोप, समितीच्या अहवालात वेगळंच कारण समोर

‘सकाळी महिला आली अन् मला अटक करा म्हणाली’

शनिवारी सकाळी 9.35 वाचेच्या सुमारास पूजा खुर्दामळे नावाची महिला ही तिच्या दोन मुलींसह बार्शी शहर पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षामध्ये आली. तिनं हातात घेतलेलं लहान मुल आम्हाला दाखवलं. ‘मी माझी मुलगी शक्ती हिचा गळा दाबून व पाण्याच्या बकेटमध्ये बुडवून तीला जिवंत मारलं आहे. मला तुम्ही अटक करा, मला गोळ्या घालून मारुन टाका’, असं म्हणाली. ड्यूटीवर असलेल्या पोलिसांना महिलेचं रुप बघून जबर हादरा बसला.

नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून ठार केल्याची कबुली

पूजा खुर्दामळे या महिलेची अधिक चौकशी पोलिसांनी केली असता, मुलीस ठार मारण्याचे कारण विचारले असता तिनं सांगितलं की, ‘मी माझ्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून, मी स्वतः व माझ्या दोन्ही मुलींना ठार मारण्याचं ठरवलं होतं’. त्यानंतर पोलिसांनी लगेच सदर महिला व तिच्या मुलीस खासगी वाहनानं बार्शीतील सरकारी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले. वैद्यकील अधिकाऱ्यांनी मुलगी शक्ती हिला तपासलं असता ती उपचारापूर्वी मयत झाल्याचं जाहीर केलं.
Maharashtra TimesCrime News : छळाला कंटाळून महिलेनं स्वत:ला संपवलं, चिमुकले आईच्या शोधात, तीन लेकरं मायेच्या छत्रछायेला पारखी; उपस्थितांचे डोळे पाणावले

‘आई मला मारू नको…’

पोलिसांनी मोठ्या मुलीकडे अधिक चौकशी केली. विचारपूस करताना धक्कादायक माहिती समोर आली. ‘माझे पप्पा सकाळी लवकर कामाला गेल्यानंतर, मम्मीने माझी लहान बहीण शक्ती हिच्याजवळ जाऊन तिचा गळा दाबला. तिला पाण्याच्या बकेटमध्ये बुडवून ठेवलं. नंतर माझा गळा दाबला, माझ्या तोंडावर उशी दाबू लागली, त्यावेळी मी तिला, मी चांगली शाळा शिकते, मी खूप मोठी होईन, मला मारु नकोस. असं सांगितल्यावर तिने मला मला सोडून दिलं. त्यानंतर मम्मी मला व शक्तीला घेऊन पोलीस ठाण्यात आली’, असं तेजलने सांगितलं. मोठ्या मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पूजा खुर्दामळे विरुध्द BNS कलम 103 (1), 109 प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा