Headlines

2 American soldiers killed in Jordan; Iran fires missiles and drones at Jordan; 2 American soldiers killed


  • Marathi News
  • International
  • 2 American Soldiers Killed In Jordan; Iran Fires Missiles And Drones At Jordan; 2 American Soldiers Killed

तेहरान/वॉशिंग्टन6 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा भडका आता होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून पुन्हा एकदा संपूर्ण पश्चिम आशियात पसरत चालला आहे. इराणने शनिवारी चार देशांना लक्ष्य केले असून सुमारे चार महिन्यांनंतर सौदी अरेबियातील अमेरिकन लष्करी तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. जॉर्डनच्या अज्रक एअरबेसवर झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात अमेरिकेचे दोन सैनिक ठार झाले आहेत.

या हल्ल्यात एक सैनिक बेपत्ता असून, चौघे जखमी आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड‌्सने दावा केला आहे की, अज्रक येथील विमानांचे हँगर्स आणि पार्किंग क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात दोन फायटर जेटसह पाच अमेरिकन विमाने उद्ध्वस्त झाली. दरम्यान, जॉर्डनने इराणची १० क्षेपणास्त्रे आणि इराकने इरबिलवर हल्ला करणारे ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. इराणने पुन्हा कुवेतच्या वॉटर प्लंट आणि ऑइल डेपोवर हल्ला केला आहे. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांनी शनिवारी उशिरा रात्री इशारा दिला की, जर अमेरिकेचे हल्ले थांबले नाहीत तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल आणि मोठा विनाश होईल.

सात दिवसांपासून अमेरिकी हल्ले; पॉवर प्लँट व पुलावर हवाई हल्ले

अमेरिकेने सातव्या रात्री इराणवर हल्ले केले. सेंट्रल कमांडनुसार, देखरेख केंद्रे, भूमिगत शस्त्र साठे व सागरी युद्ध क्षमतेशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य केले. बोंजी येथे पॉवर-वॉटर प्लँटवर क्षेपणास्त्रे डागली. यामुळे २० गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला. बंदर अब्बासकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील दोन बोगदे आणि पूल खराब झाला.

दावा…

होर्मुझमध्ये २ तेल टँकर माइनला धडकले : इराणने दावा केला आहे की, शुक्रवार उशिरा रात्री होर्मुझमध्ये दोन तेल टँकर माइनला धडकल्यामुळे स्फोट झाला. मात्र जहाजांची नावे, जीवितहानीबाबत माहिती देण्यात आलेली नाही. अमेरिकी दावा चुकीचा असल्याचे सांगितले.

ब्रेंट क्रूड…

एका आठवड्यात १६% पर्यंत वधारले : होर्मुझमध्ये जहाजांची वाहतूक घटल्यामुळे ब्रेंट क्रूड शुक्रवारी १६% साप्ताहिक उसळीसह ८८.१० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.

सौदी समर्थनातील हुती बंडखोरांवर लष्करी हल्ले करू शकतो पाकिस्तान

कामरान हकीमी | तेहरान: इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर हुती बंडखोरांच्या एन्ट्रीमुळे संघर्षाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने पाकिस्तानला परिस्थिती बिघडल्यास सज्ज राहण्यास सांगितले आहे. तथापि, पाकिस्तान थेट इराणच्या विरोधात मैदानात उतरणार नाही. अशा परिस्थितीत तो सौदीच्या सुरक्षेच्या नावाखाली येमेनमधील हुती बंडखोरांवर हल्ला करू शकतो. या निर्णयामागे सर्वात मोठे कारण सप्टेंबर २०२५ मध्ये झालेला पाकिस्तान-सौदी संरक्षण करार आहे. हुती बंडखोरांनी सौदीच्या अबहा विमानतळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आहे. इराणवर थेट हल्ला करणे पाकिस्तानसाठी अधिक धोकादायक ठरेल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत