Headlines

Eva Grover : आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न, नवऱ्यानेच कामासाठी ठेवायला सांगितले निर्मात्यांसोबत संबंध; अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग


Eva Grover : टीव्ही अभिनेत्री इवा ग्रोव्हरनं आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खानसोबत लग्न केलेलं. मात्र, हैदरनं इवाचा शारीरिक छळ केला. याबद्दल तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

Eva Grover On Dangerous Experience Of Ex Husband Hyder Ali Khan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – करिश्मा का करिश्मा’, ‘कोरा कागझ’ आणि ‘बिदाई’ यांसारख्या मालिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री इवा ग्रोव्हरने नुकताच एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. इवा ग्रोव्हरचं लग्न आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खानसोबत झालं होतं. या लग्नात अभिनेत्रीला प्रचंड त्रास आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. हैदरने अभिनेत्रीवर काम मिळवण्यासाठी दाबावही टाकलेला, याबद्दलही तिनं मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

हैदर अली खानसोबतच्या लग्नाबद्दल बोलताना इवा ग्रोव्हर म्हणाली की, ‘माझ्या मैत्रिणीने माझी हैदर अली खानसोबत ओळख करून दिलेली. त्यावेळी तो चांगल्या ठिकाणी नोकरीला होता आणि त्याला पगारही चांगला होता. १८ दिवसांच्या डेटिंगनंतर त्याने मला लग्नासाठी विचारलं. माझ्या आईचा या लग्नाला विरोध होता. पण, मी प्रेमाखातर लग्नासाठी होकार दिला. या लग्नात मला खूप छळ सहन करावा लागला. मुल झाल्यावर सगळं ठीक होईल असं वाटलेलं, पण तसं झालं नाही.’
Maharashtra TimesPrakash Raj : ‘हुकुमशाहीसारखं वागणारं घाबरट सरकार’, सोनम वांगचुक यांना रुगणालयात दाखल केल्याप्रकरणी प्रकाश राज यांची मोदी सरकारवर टीका
हैदरच्या आजाराबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली की, ‘हैदरला स्क्रिजोफेनिया होता आणि या आजाराबद्दल मला आधी माहित नव्हतं. त्याने मला मारहाण केली. दारू पिऊन येऊन तो मला मारायचा. लग्नाआधी मला याबद्दल माहित नव्हतं. लग्नाच्या ३ दिवसात त्याचं खरं रूप माझ्यासमोर आलं.त्याने नोकरीही सोडलेली. मी याबद्दल कोणाला सांगू शकत नव्हते. हैदर माझ्यावर संशय घ्यायचा.’

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

इवा ग्रोव्हरनं सांगितला प्रसंग

पुढे इवा म्हणाली की, ‘हैदरने मला काम मिळवण्यासाठी निर्मात्यांसोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले होते. माझ्यावर दबाव टाकण्यात आलेला. माझा नवरा मला म्हणालेला, ‘काय फरक पडतो. तुला करावं लागेल. तुला घर चालवायचंय, मुलीचा खर्च करायचाय. अभिनेत्रींना प्रपोजल येतात.’ त्यावेळी मी त्याच्यासोबत घटस्फोट घेण्याचं ठरवलं. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये इवा बोलत होती.
Maharashtra TimesMedha Manjrekar : ‘ट्रीपवरून आल्यावर टेस्ट केली, 8 महिन्यांपासून कॅन्सरचा प्रवास सुरू आहे’, आजारपणावर मेधा मांजरेकर यांची प्रतिक्रिया
या काळात, इवा ‘वक्त बतेगा कौन अपना कौन पराया’ या शोमध्ये काम करत होती. अभिनेत्रीनं सांगितलं की, शोमधील तिच्या सहकलाकारांना तिला होणाऱ्या त्रासाबद्दल समजलं आणि जेव्हा तिला सर्वात जास्त गरज होती तेव्हा ते कलाकार तिच्या मदतीला धावून आले. एके दिवशी, संपूर्ण युनिटनं अभिनेत्रीला मदत करण्याचा निर्णय घेतला. सगळे कलाकार इवाच्या घरी गेले आणि आईला समजावलं. शो मधील कलाकार या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अभिनेत्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.