Headlines

Isha Keskar On Rishi Saxena : 9 वर्षांपासून लिव्ह-इन, ईशा केसकरनं सांगितलं ऋषी सक्सेनाच्या प्रेमात पडण्याचं कारण, म्हणाली, ‘कठीण काळात तो माझ्यासोबत होता’


Isha Keskar On Rishi Saxena : मराठी अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना ९ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहतायत. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीनं ऋषीच्या प्रेमात पडण्याचं कारण सांगितलं आहे.

Isha Keskar On Her Love Story With Rishi Saxena
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेता ऋषी सक्सेना ला झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली आणि तो घराघरात पोहोचला. ऋषी हा मुळचा राजस्थानचा असून त्यानं जोधपुर येथे शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर ऋषी मॉडेलिंगसाठी मुंबईत आला. त्यानंतर त्यानं वडिलांच्या सांगण्यावरून अभिनयात येण्याचा निर्णय घेतला. नाटकांमध्ये काम केल्यानंतर मित्राच्या सांगण्यावरून अभिनेत्यानं ‘काहे दिया परदेस’ या मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि ऋषीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अभिनेता प्रोफेशनल आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. ऋषी सक्सेना मराठी अभिनेत्री ईशा केसकरसोबत ९ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहतोय. याबद्दल ईशानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. याच मुलाखतीमध्ये ईशानं ऋषीच्या प्रेमात पडण्याचं कारणही सांगितलं आहे.

अभिनेत्रीनं सांगितलं प्रेमात पडण्याचं कारण

मुलाखतीदरम्यान ईशा केसकर म्हणाली की, ‘ऋषीची मला कोव्हिडमध्ये खूप जास्त मदत झाली. आम्ही दोघंही एकमेकांसाठी उभे राहिलो. मी अशा लोकांच्या सहवासात मोठी झालीये, जे एकमेकांना समजून घेणारे आहेत. मी ऋषीच्या प्रेमात पडले ते त्याची भाषा पाहून नाही तर. ऋषी कसा आहे, त्याचं माझं काय मॅच होतंय, माझा काय कम्फर्ट आहे? त्या हिशोबानं मी प्रेमात पडले. त्या परिस्थितीसाठी ते योग्य होतं. कोव्हिडच्या दरम्याने माझे वडील गेले, तेव्हा तो कायम माझ्याबरोबर होता. त्याची साथ होती म्हणूनच मला एकटं वाटलं नाही. त्यामुळे मी नेहमी या सगळ्याचं श्रेय त्याला देते.’

ईशा केसकरने सांगितलं गुपित, येतोय नवा सिनेमा, मोठमोठ्या कलाकारांसोबत दिसणार,पण सिनेमांचं नाव काय?

ईशा पुढे म्हणाली की, ‘एक मित्र म्हणून माझं त्याच्यावर विशेष प्रेम आहे. तो माणूस म्हणून पण खूपच चांगला आहे. तो एका हेल्दी वातावरण असलेल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याला त्याच्या आई-बाबांचा कायम पाठिंबा मिळालाय. भावनिक सपोर्टही खूप चांगला आहे. त्यामुळे तो माणूस म्हणून ग्रीन फ्लॅग, एकदम ग्रीन फॉरेस्ट आहे.’
Maharashtra TimesMedha Manjrekar : ‘ट्रीपवरून आल्यावर टेस्ट केली, 8 महिन्यांपासून कॅन्सरचा प्रवास सुरू आहे’, आजारपणावर मेधा मांजरेकर यांची प्रतिक्रिया
‘तो माझ्यासाठी मराठी भाषा शिकला. मी त्याला एका जागी बसून मराठी शिकवलेलं नाहीये. मी थेट भांडायचे. त्यामुळे तो ऐकून-ऐकून हळुहळू शिकला. मग, मी जरा पुढाकार घेतला की, तुझे मराठीचे उच्चार वगैरे बरे आहेत आणि अशाप्रकारे तो मराठी शिकला.’ असंही ईशानं शेवटी सांगितलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ईशा केसकर बोलत होती.