8th CPC Fitment Factor Salary Calculator: केंद्र सरकारचे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर बाबत शिफारशींची प्रतीक्षा करत आहेत. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी आणि एकूण पगारातही मोठी वाढ अपेक्षित असून विविध अंदाजांनुसार आठव्या वेतन आयोगातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात 31% ते 68% पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?
केंद्र सरकारची प्रमुख कर्मचारी संघटना राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणेने (NC-JCM) आठव्या वेतन आयोगाकडून 3.833 फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव दिला आहे. इतक्या प्रमाणातील मोठी वाढ खूपच महत्त्वाकांक्षी असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणजे असले तरीही आठवा वेतन आयोग 2.0 ते 2.25 दरम्यान फिटमेंट फॅक्टरवर शिक्कामोर्तब करेल, असे बहुतेकांचे म्हणणे आहे.
Share Market वर 200% टॅरिफचा घाव; ट्रम्प यांच्या घोषणेचे मुंबई शेअर बाजारात पडसाद, फार्मा स्टॉक्स गडगडले
मात्र, लक्षात घ्या की वेतन आयोगाने 2.25 फिटमेंट फॅक्टर निश्चित केला, तरीकेंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारातही त्याच प्रमाणात वाढ होईल, असं गरजेचं नाही.
उदाहणार्थ, 7व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 2.57 होता पण तरीही एकूण पगारात केवळ 14.29% वाढ झाली तर, याउलट सहाव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 1.86 असूनही एकूण पगारात 54% वाढ झाली आणि चौथ्या व 5व्या वेतन आयोगाअंतर्गत अनुक्रमे एकूण 27.60%, 31% पगारवाढ दिली गेलेली. अशाप्रकारे, बँकबाजारच्या अंदाजानुसार, आठव्या वेतन आयोगाने 2.0-2.57 दरम्यान फिटमेंट फॅक्टर्स अंतिम केले तरीही लेव्हल 1-18 कर्मचाऱ्यांना केवळ 31-68% पर्यंतच पगारवाढ मिळू शकते.
भत्त्यांचा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणारा परिणाम
अशा परिस्थितीत, प्रश्न उपस्थित होतो की फिटमेंट फॅक्टर जास्त असूनही एकूण पगारवाढ कमी का? या प्रश्नाचं उत्तर आहे महागाई भत्त्याचा दर. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराचे मूळ घटक – मूळ पगार, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि एकूण प्रवास भत्ता (TPTA) – जे सामान्यतः समान भत्ते आहेत. मात्र, इतर सॅलरी अलावंस कर्मचाऱ्याचे काम, नोकरीची स्थिती, कामातील धोके, नियुक्तीचे ठिकाण इत्यादींनुसार बदलू शकते.
Labour Code Rules: 7 तारखेपर्यंत पगार, 2 दिवसांत फुल अँड फायनल; काय आहे नवीन कामगार कायद्याचा नियम?
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारने 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली, जो 2026 मध्ये कार्यान्वित झाला. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वेतन आयोग पोर्टल सुरू केले गेले असून कर्मचारी संघटना आणि इतर हितधारकांसोबत विविध ठिकाणी बैठका आयोजित केल्या गेल्या तर, आता सर्वांची नजर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर लागून असेल.

