Central Govt Employees Fitment Factor: आठवा केंद्रीय वेतन आयोग राज्य सरकारांसोबत वाटाघाटींच्या अंतिम टप्प्यात असून केंद्र आणि राज्य सरकारांवरील आर्थिक भार लक्षात घेता आयोग फिटमेंट फॅक्टरबाबत सावधगिरी बाळगण्याची शक्यता आहे. आयोगाने अद्याप आपल्या शिफारशींना अंतिम रूप दिले नसले तरी, प्राथमिक चर्चेनुसार फिटमेंट फॅक्टर 7 व्या वेतन आयोगाच्या 2.57 गुणकाच्या जवळपासच असू शकतो.

फिटमेंट फॅक्टरवर केंद्रीय कर्मचाऱ्यांची नजर
जितक्या लवकर आयोग आपला अहवाल सादर करेल आणि सरकार त्याला मंजुरी देईल, तितक्याच लवकर कर्मचाऱ्यांना नवीन वेतन रचनेचा फायदा मिळू लागेल. पण फिटमेंट फॅक्टरबाबत आयोग आणि सरकारची अंतिम भूमिका सर्वात महत्त्वाची असेल. अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसला तरी, देशव्यापी बैठका आणि प्राथमिक चर्चांमधून सरकारी तिजोरीवरील मोठा भार लक्षात घेता, आयोग फिटमेंट फॅक्टरबाबत एक संतुलित आणि सावध भूमिका घेण्याची चिन्हे मिळत आहे.
Property Rules: वडिलांनी एकाच मुलाला मालमत्ता दिल्यास दुसऱ्या मुला-मुलीचा हक्क राहतो का? हे कितपत कायदेशीर, नियम काय सांगतो
फिटमेंट फॅक्टरवर कर्मचारी संघटनेची मागणी काय
नॅशनल कौन्सिल (NC-JCM) आणि रेल्वेसह विविध संघटनांनी 3.15 ते 3.83 पर्यंत फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18000 रुपयांवरून 68,940 रुपयांपर्यंत वाढेल. अशाप्रकारे, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची एकीकडे चंगळ होईल पण दुसरीकडे, सरकारच्या तिजोरीवर दबावही वाढेल.
Inflation Rate: अमेरिकेत महागाईचा आगडोंब, पण चटके जगाला; भारतावरही होणार परिणाम, बाजारासाठी नेमकं संकेत काय?
अशा स्थितीत, सरकार 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी प्रारंभिक फिटमेंट 1.83 ते 2.28 दरम्यान निश्चित करू शकते. इकॉनॉमिक टाइम्सने एका संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देऊन सांगितले की नव्या वेतन आयोगाच्या चर्चेचा अंतिम टप्पा आता फिटमेंट फॅक्टरची संभाव्य श्रेणी, राज्य सरकारांशी चर्चा आणि सुधारित वेतन व निवृत्तीवेतन रचनेच्या आर्थिक परिणामाचे मूल्यांकन करणे या दोन हालचालींवर असेल. केंद्र आणि राज्य सरकारांवरील आर्थिक भाराचे मूल्यांकन अंतिम वेतन व निवृत्तीवेतन रचना निश्चित करण्यात निर्णायक भूमिका बजावू शकते.
LPG Supply: अखेर ‘तो’ दिवस आलाच! LPG पुरवठ्याबद्दल सरकारचा मोठा निर्णय; कोट्यवधी नागरिकांना दिलासा
फिटमेंट फॅक्टरचा सरकारच्या तिजोरीवर ताण
फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना केवळ वेतनवाढ मिळत नाही तर पेन्शनमध्येही वाढ होते. याशिवाय थकबाकी आणखी एक मोठा खर्च आहे. अशा स्थितीत, 2.28-2.86 चा फॉर्म्युला निवडून सरकार हुशारीने निर्णय घेईल. फिटमेंट फॅक्टर 2.28 असल्यास मूळ पगारात 34.1 टक्के म्हणेज 41000 रुपये वाढ होईल. अशाप्रकारे, सरकार नक्कीच फिटमेंट फॅक्टरबाबत सावध भूमिका घेऊ शकते.

