Headlines

8,000 रुपयांचा फोन बहिणीला गिफ्ट करा, टॉप-5 स्मार्टफोन्स, 50MP कॅमेऱ्यासह फीचर्सही दमदार । Maharashtra Times


बहिणीला गिफ्ट देण्यासाठी जर तुम्ही कमी बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधत असाल, तर सध्या बाजारात अनेक भन्नाट पर्याय उपलब्ध आहेत. अवघ्या 8,000 रुपयांच्या आत तुम्हाला 50 मेगापिक्सल कॅमेरा, 5000mAh ची मोठी बॅटरी आणि स्टाईलिश लूक देणारे सॅमसंग, शाओमी आणि रिअलमीचे उत्तम फोन्स सहज मिळतील, जे बहिणीला नक्कीच आवडतील. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Best Smartphone Gift Under 8000। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
स्मार्टफोनच्या दुनियेत आता बजेट विभागामध्येही जबरदस्त फीचर्स पाहायला मिळत आहेत. जर तुम्हाला बहिणीला एखादे उपयुक्त गॅजेट गिफ्ट करायचे असेल, तर 8,000 च्या किमतीत येणारे टॉप-5 स्मार्टफोन्स हा एक उत्तम पर्याय आहे. उत्तम डिस्प्ले, वेगवान प्रोसेसर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह हे फोन्स दैनंदिन वापरासाठी अतिशय सर्वोत्तम आणि परवडणारे आहेत.

या कमी बजेटमध्ये आकर्षक डिझाईन, 50 मेगापिक्सलपर्यंतचा मुख्य कॅमेरा आणि 5000mAh ची तगडी बॅटरी यांसारखे प्रीमियम फीचर्स युजर्सना पाहायला मिळत आहेत. खालील यादीत दिलेल्या अधिकृत स्पेसिफिकेशन्स आणि किमतींच्या आधारे तुम्ही बहिणीसाठी योग्य फोन निवडू शकता.

1. Xiaomi Redmi A4

या बजेटमध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी यात स्नॅपड्रॅगन 4एस जेन 2 (Snapdragon 4s Gen 2) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी एआय कॅमेरा आणि 5160mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. मायस्मार्टप्राइसच्या माहितीनुसार, हा फोन बाजारात साधारण 7,965 च्या किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

2. Samsung Galaxy F05

सॅमसंगच्या विश्वासार्हतेसह येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G85 (MediaTek Helio G85) ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 4GB रॅम मिळते. रीअर पॅनलवर 50MP + 2MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी 5000mAh बॅटरी असून त्याची सध्याची किंमत 6,499 आहे.

3. realme C61

स्टायलिश लुक आणि स्लिम डिझाईन आवडणाऱ्यांसाठी Unisoc T612 प्रोसेसर आणि 4GB रॅम असलेला हा एक चांगला पर्याय आहे. यात तब्बल 32 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिलेला आहे, जो या बजेटमधील इतर फोन्सच्या तुलनेत उत्तम सेल्फी आणि फोटो देतो. 6.78 इंचाचा डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर 7,249 च्या आसपास आहे.

4. Infinix Smart 8 HD

तुमचे बजेट अगदीच मर्यादित असेल, तर अवघ्या 6,690 मध्ये हा फोन युनिसॉक T606 प्रोसेसर आणि 64GB स्टोरेज ऑफर करतो. यात 6.6 इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे, ज्यामुळे सोशल मीडिया स्क्रोलिंग अतिशय स्मूथ होते. फोनमध्ये 13MP ड्युअल कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

5. Samsung Galaxy M04

डेली युसेज आणि कॉलिंगसाठी सॅमसंगचा हा बजेट फोन 4GB रॅम आणि मीडियाटेक हेलिओ P35 (MediaTek Helio P35) प्रोसेसरसह येतो. यात 6.5 इंचाचा डिस्प्ले, 13MP + 2MP ड्युअल रिअर कॅमेरा आणि 5000mAh ची दीर्घकाळ टिकणारी बॅटरी मिळते. सध्या हा डिव्हाइस बाजारामध्ये 7,499 च्या किमतीत उपलब्ध आहे.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा