Caracas Twin Earthquakes: व्हेनेझुएलामध्ये बुधवारी सायंकाळी एका पाठोपाठ एक दुहेरी भूकंपाचे धक्के बसले. यामुळे संपूर्ण देश हादरला असून 10 हजार नागरिकांचा बळी गेला असल्याची भीती आहे. यानंतर आता त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कॅराकास (व्हेनेझुएला): एका मिनिटाचा आत व्हेनेझुएलामध्ये दुहेरी भूकंपांमुळे संपूर्ण जणजीवन विस्कळीत झालं आहे. काही सेंकदांच्या अंतरावरच देशात 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसल्यामुळे संपूर्ण काराकस शहरात इमराती कोसळल्या आहेत. या भूकंपामध्ये तब्बल 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात होती आणि आता तर हा आकडा एक लाखावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतर व्हेनेझुएलामध्ये त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
बुधवारी सायंकाळी दक्षिण अमेरिकामधील व्हेनेझुएला देशात भूकंपाचे दोन धक्के बसले. स्थानकि वेळेनुसार संध्याकाळी 6.04च्या सुमारास उत्तर-मध्य व्हेनेझुएलामधील मॉन्टलबॅनजवळ पहिला 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर काही क्षणातचं 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या दोन्ही भूकंपाचे धक्के व्हेनेझुएलाच्या अनेक राज्यांमध्ये आणि त्यासह कोलंबिया या शेजारी देशातील काही भागांमध्येही जाणवले.
या भूंकपामुळे व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसमध्ये अनेक इमारती कोसळल्या, घरं उध्वस्त झाली आहेत. भूकंपाचे हादरे बसताच नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. युनायटेट स्टेट्स जिओलॉजिकस सर्व्हेच्या महितीनुसार, पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोन किनारपट्टीच्या पश्चिमेस सुमारे 21 किलोमीटर अंतरावर नोंदवला गेला. त्यानंतर अवघ्या 39 सेकंदांनंतर त्याच्या 45 किलोमीटर अंतरावर दुसऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हे दुहेरी भूकंप अत्यंत दुर्मीळ घटनांपैकी एक मानले जात आहेत.
व्हेनेझुएलाचे गृहमंत्री डिओसडाडो कॅबेली यांनी लोकांना नुकसान झालेल्या इमारती खाली करण्याचे आवाहन केलं आहेत. बचाव पथकं सध्या ढिगाऱ्यांकाळून जखमी आणि मृत व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर या भूकंपाचे थरारक दृश्य पसरली आहेत. यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एका विमानतळाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये हादरे बसताना प्रवासी धडपडत आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. इतर व्हिडीओमध्ये देशात सर्वत्र कोसळलेल्या इमारती, घरांच्या तुटलेल्या खिडक्या दिसून येत आहे.
दुहेरी भूकंप म्हणजे नेमकं काय?
एका भागांत अल्प कालावधीत आणि एक सारख्या तीव्रतेच्या भूकंपाला दुहेरी भूकंप असं म्हटलं जातं. एकाच ठिकाणावरून समान लहरी तयार झाल्यामुळे ही घटना घडते. पहिल्या भूकंपाचा परिणाम जरी कमी झाला तरी दुसर्या भूकंपाच्या तीव्रतेमुळे मोठे धक्के बसतात. पण व्हेनेझुएलामध्ये एकाच वेळी दोन तीव्र भूकंपाचे हादरे बसल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. सध्या 32 जणांचा मृत्यू झाला असून 700हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. नागरिकांना ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम सुरू असून मृतांचा आकडा एक लाखावर पोहोचण्याची शक्यता आहे.
या भूकंपानंतर पोर्तो रिको, अमेरिका आणि ब्रिटिश व्हरजिन बेटांवरील काही भागांत त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी व्हेनेझुएलामध्ये 1967 आणि 1812मध्ये दुहेरी भूकंपाचे धक्के बसले होते. पण 1967मध्ये भूकंपांची तीव्रता 6.6 रिश्टर स्केलच्या आसपास असल्यामुळे 300 जणांचा प्राण गेले होते. पण 1862च्या भूकंपाचे धक्के या भूकंपाइतकेच नोंदले गेले होते. तेव्हा तब्बल 15 ते 20 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा