Headlines

25 year old girl ends life preparing for police recruitment serious allegations against teacher; पोलीस होण्याचं स्वप्न, पण अकॅडमीत भयंकर अनुभव; २५ वर्षीय भाग्यश्रीने मृत्यूला कवटाळलं


अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आळकुटीच्या लेकीचा पोलीस भरतीचा प्रवास आळेफाट्यात दुर्दैवी वळणावर थांबला. पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या २५ वर्षीय भाग्यश्री भास्कर भंडारी हिने आळेफाटा येथे टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. अकॅडमी शिक्षकाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याच्या आरोपावरून मयुर अशोक डुंबरे (रा. खामुंडी, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध आळेफाटा पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळकुटी येथील भाग्यश्री पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी आळेफाटा येथे राहत होती. कुटुंबाच्या अपेक्षा आणि स्वतःचे पोलीस होण्याचे स्वप्न घेऊन ती मेहनत करत होती. मात्र, काही दिवसांपासून अकॅडमीतील शिक्षक मयुर डुंबरे याच्याकडून तिला वर्गात तसेच इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानास्पद वागणूक दिली जात होती आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यापूर्वीच्या एका घटनेच्या पार्श्वभूमीवर डुंबरे याला पोलीस ठाण्यात जावे लागले होते. याच कारणाचा राग मनात धरून त्याने भाग्यश्रीला लक्ष्य केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून भाग्यश्रीने अखेर राहत्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपविल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

नगरच्या लेकीच्या मृत्यूने कुटुंबावर आघात

भाग्यश्रीची बहीण शितल भंडारी शासकीय सेवेत कार्यरत असून, बहिणीच्या मृत्यूनंतर त्यांनी आळेफाटा पोलिसांत फिर्याद दाखल केली. भाग्यश्रीच्या मृत्यूमागील नेमके कारण समोर यावं आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून होत आहे.

पोलीस होण्याचे स्वप्न मृत्यूने संपले

अहिल्यानगरच्या मातीतून पोलीस होण्याचे स्वप्न घेऊन बाहेर पडलेली भाग्यश्री आता कधीच गणवेशात दिसणार नाही, या विचाराने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अकॅडमी संस्कृतीवरही प्रश्नचिन्ह

भाग्यश्रीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा परिसरातील खासगी अकॅडमींच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना त्यांच्यावर मानसिक दबाव किंवा अपमानास्पद वर्तन होत नाही ना, याची प्रशासनाने तपासणी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. भाग्यश्रीला नेमका कोणत्या स्वरूपाचा त्रास झाला? त्या त्रासामागे कोणत्या घटना होत्या? तिच्या आत्महत्येला कोणत्या परिस्थिती कारणीभूत ठरल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून समोर येणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत