Keralam Baby Death दुर्दैवी ! ओठाला टाके घालण्यासाठी दिली भूल १८ महिन्याच्या बाळाचा करुण अंत
केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील एका रुग्णालयात भूल दिल्यानंतर १८ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कन्नूरमधील एरामम-कुट्टूर येथील रहिवासी टी. सूरज आणि विजीशा यांचा एकुलता एक मुलगा देवांश शौर्य, ५ जुलै रोजी घराबाहेर खेळत असताना पडल्याने त्याच्या ओठाला जखम झाली. त्याला सुरुवातीला प्रथमोपचारासाठी मथमंगलम येथील प्राथमिक आरोग्य…
