भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे मुंबई विद्यापीठाच्या ‘आविष्कार-२०२६’ संशोधन अधिवेशन कार्यशाळेचे आयोजन
सावंतवाडी/वार्ताहर : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या २१ व्या ‘आविष्कार’ संशोधन अधिवेशन २०२६–२७ अनुषंगाने दोन दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी कॉलेजकडे सोपविण्यात आली असून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून यास मान्यता देण्यात आली आहे. ही कार्यशाळा दि. १ व…
