सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवार आज रस्त्यावर:छत्रपती संभाजीनगरात रास्ता रोकोनंतर अन्नत्याग आंदोलन, सुप्रिया सुळेंसह विरोधी नेत्यांची उपस्थिती
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार आज छत्रपती संभाजीनगरात मोठे आंदोलन करणार आहेत. सकाळी 10 वाजता केंब्रिज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, त्यानंतर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते सहभागी होणार…
