Lohagad Ketan Agarwal Death Case : सियाचा वाढदिवस असल्याने महाबळेश्वर येथे मुक्कामासह सेलिब्रेशनचे नियोजन करण्यात आले होते. परंतु त्या मुक्कामादरम्यान केतनसोबत एकाच खोलीत राहण्याची वेळ येणार असल्याने सियाला मोठा प्लॅन आखला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : बालीचे नियोजित प्री-वेडिंग फोटोशूट आणि महाबळेश्वर येथील वाढदिवसाची पार्टी या ठिकाणी केतनसोबत मुक्काम टाळण्यासाठी सिया गोयलने नाना तऱ्हा केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. केतनचा पासपोर्ट गायब करणे आणि खुनाचा कट १८ जूनलाच रचणे या गोष्टी केवळ केतन सोबतचा मुक्काम टाळण्यासाठी केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
एकाच खोलीत राहण्याची वेळ टाळली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांच्या विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात होती. लग्नाचे ठिकाण निश्चित झाले होते, तर इतर तयारीही पूर्ण झाली होती. १९ जूनला सियाचा वाढदिवस असल्याने महाबळेश्वर येथे मुक्कामासह सेलिब्रेशनचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी हॉटेलचे बुकिंगही करण्यात आले होते. मात्र, त्या मुक्कामादरम्यान केतनसोबत एकाच खोलीत राहण्याची वेळ येणार असल्याने सियाने १८ जूनला त्याचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचा दावा पोलिस तपासात करण्यात आला आहे.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी सकाळी संशयित सिया गोयलला कडेकोट बंदोबस्तात लोहगड किल्ल्यावर नेऊन ‘क्राइम सीन रिक्रिएशन’ केले.
उद्धव ठाकरे सेनामुक्त महाराष्ट्र, जे उरलंय ते सांभाळा; गिरीश महाजनांचा पलटवार
फायबरचा डमी पुतळा दरीत फेकला
रविवारी सकाळी सुमारे सहा ते अकरा या कालावधीत लोहगड किल्ला सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. संशयित सिया गोयलकडून घटनास्थळी प्रत्येक हालचालीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. तिने केतनला नेमके कुठे उभे केले, स्वतः कोणत्या ठिकाणी थांबली आणि कथितपणे सहसंशयित चेतन चौधरीला कसा संकेत दिला, याची माहिती घटनास्थळी तपासण्यात आली. त्यानंतर फायबरच्या डमी पुतळ्याचा वापर करून तो दरीत फेकण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. Vaibhav Jadhav : व्हिडिओ कॉल करुन दाखव मला, केतनचा टॅक्सी चालकाला फोन; सिया-साहिलची भांडणं ते फूड मॉलवरील अजब प्रकार, वैभव जाधव काय म्हणाला? पोलिस तपासानुसार, केतन अग्रवाल याला संपविण्याचा कट कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथील एका कॅफेमध्ये झालेल्या बैठकींमध्ये रचण्यात आला होता. केतनला कुठे न्यायचे, कोणत्या ठिकाणी हल्ला करायचा, अपघाताचा आभास कसा निर्माण करायचा आणि संशय कसा टाळायचा, याचे नियोजन आरोपींनी आधीच केल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे. १८ जूनला रोजी सिया गोयल केतनला लोहगडावर घेऊन गेली होती, तर चेतन चौधरी आधीपासूनच तेथे उपस्थित होता. ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सियाने खाली बसून चेतनला संकेत दिला. त्यानंतर चेतनने मागून येत केतनला दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा