Headlines

2026 Candere Hurun India Women Leaders List; उद्योग जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या 10 ज्येष्ठ महिला उद्योजिका; स्वतःच्या बळावर उभी केली साम्राज्ये

2026 Candere Hurun India Women Leaders List: भारतीय महिला जागतिक स्तरावर, विशेषतः व्यावसायिक लीडर म्हणून ओळखल्या जात आहेत आणि या महिलांची ओळख वयाच्या पलीकडची आहे. Candere हुरुन इंडिया वुमन लीडर्सच्या 2026 च्या नवीन यादीतील या व्यावसायिक महिलांचा प्रभाव वाढत्या व्यासोबत अजिबात कमी झालेला नाही.

2026 Candere Hurun India Women Leaders List
2026 कॅंडेरे हुरुन इंडिया महिला लीडर्सची यादी
Women in Business: 66 वर्षीय महिलांपासून ते उद्योगातील 81 वर्षांच्या अनुभवी नेत्यापर्यंत भारतातील अत्यंत अनुभवी महिला नेतृत्व देशातील काही सर्वात मोठ्या कंपन्यांचे प्रमुखपद भूषवत आहेत. ‘कँडेरे हुरुन इंडिया वुमन लीडर्स लिस्ट 2026’ या लिस्टमध्ये विविध पिढ्यांमधील यशस्वी महिलांचा समावेश आहे. यामध्ये 19 वर्षीय पॅरा-आर्चरपासून ते 86 वर्षीय उद्योजिकेचा समावेश आहे, ज्या आजही आपल्या कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत.कँडेर हुरुन इंडिया 2026, कँडेर हुरुन इंडिया 2026 लिस्ट,

वयस्कर महिलांनी उभारले लाखो कोटींचे साम्राज्य

वयस्कर महिलांनी उभारले लाखो कोटींचे साम्राज्य

Top-10 महिला उद्योजिका 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या असून सुमारे 4.3 लाख कोटींच्या एकूण बाजार भांडवलाच्या कंपन्या चालवतात. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींच्या विहीणबाईस्वाती पिरामल यांचाही या यादीत समावेश असून विशेष म्हणजे या महिलांना व्यवसायाचा वारसा नाही मिळाला तर स्वतःच्या बळावर स्वतःची साम्राज्ये उभी केली. (प्रातिनिधिक फोटो)

Top-3 मध्ये मुकेश अंबानींच्या विहीणबाई

Top-3 मध्ये मुकेश अंबानींच्या विहीणबाई

हुरूनच्या या लिस्टमध्ये सर्वात वयस्कर महिला उद्योजकांच्या यादीत टॉप-3 मध्ये अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइजच्या 68 वर्षीय प्रीथा रेड्डी आणि 67 वर्षीय सुनीता रेड्डी दुसऱ्या क्रमांकावर ज्या 1,21,770 कोटींचा व्यवसाय सांभाळतात. तसेच या लिस्टमध्ये पिरामल ग्रुपच्या 70 वर्षीय स्वाती पिरामल तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन 85,850 कोटी रुपये आहे.

स्वाती पिरामल कोण?

स्वाती पिरामल कोण?

पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांच्या पत्नी आणि उपाध्यक्ष स्वाती पिरामल या रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींच्या विहीणबाई आहेत. स्वाती पिरामल या अंबानींची मुलगी ईशा अंबानींच्या सासू असून 12 डिसेंबर 2018 रोजी इशा आणि आनंद पिरामल यांनी लग्नगाठ बांधली. देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी पिरामल ग्रुप जगभरातील 30 देशांमध्ये कार्यरत आहे. कंपनीचे औषधनिर्माण, आरोग्यसेवा आणि वित्तीय सेवा क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण व्यावसायिक हितसंबंध आहेत.

81 व्या वर्षीही कंपनीचे नेतृत्व

81 व्या वर्षीही कंपनीचे नेतृत्व

भारतातील सर्वात वयस्कर महिला व्यावसायिक लीडर्सच्या लिस्टमध्ये पुढे बायोकॉनच्या 73 वर्षीय किरण मजूमदार-शॉ 67,440 कोटींच्या कंपनीचे नेतृत्व करत आहे. तसेच सेल्सफोर्स इंडियाच्या 79 वर्षीय अरुंधती भट्टाचार्य 45,940 कोटींच्या बाजार भांडवलासह 5व्या क्रमांकावर असून पहिल्या 10 महिलांच्या लिस्टमध्ये गॉडफ्रे फिलिप्स इंडियाच्या प्रमुख 81 वर्षीय बिना मोदी यांचाही समावेश आहे, ज्यांच्या कंपनीचे मूल्यांकन 34,930 कोटी रुपये आहे.

इतरही महिलांचा दबदबा

इतरही महिलांचा दबदबा

याशिवाय या लिस्टमध्ये पुढे 69 वर्षांच्या USV च्या लीना गांधी तिवारी सातव्या क्रमांकावर असून 32,460 कोटींच्या कंपनीचे नेतृत्व करत आहेत. 22,990 कोटींचे बाजारमूल्य असलेल्या TAFE या ट्रॅक्टर आणि कृषी उपकरण कंपनीच्या प्रमुख 66 वर्षीय मल्लिका श्रीनिवासन यादीत आठव्या स्थानावर असून नवव्या क्रमांकावर सुड-केमी इंडियाच्या 66 वर्षीय अर्शिया ए लालजी तर, दहाव्या स्थानावर जेके लक्ष्मी सिमेंटच्या 74 वर्षीय विनिता सिंघानिया आहेत, ज्या 7410 कोटींच्या कंपनीचे व्यवस्थापन करतात.

प्रत्येक क्षेत्रात पसरलाय व्यवसाय

प्रत्येक क्षेत्रात पसरलाय व्यवसाय

भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राला आकार देण्यात या अनुभवी महिलांचे योगदान Candere Hurun India Women Leaders या लिस्टमधून समोर येते. ज्येष्ठ श्रेणीतील सर्वात तरुण महिला व्यावसायिक नेत्या 66 वर्षांच्या, तर सर्वात वयस्कर 81 वर्षांच्या असून या यादीत आरोग्यसेवा, औषधनिर्माण, उत्पादन, तंत्रज्ञान, सिमेंट आणि एफएमसीजी (FMCG) यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा