Headlines

20 ते 24 ऑगस्टदरम्यान जोरदार पाऊस, सॅटेलाईट फोटोंमधून समोर आला मान्सूनचा नवा धमाका। Maharashtra Times


उत्तर आणि पश्चिम भारतात पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याचं सॅटेलाईट फोटोंमधून दिसत आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या 20 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान पूर्व भारतामध्ये पावसाचा एक अत्यंत सक्रिय टप्पा पाहायला मिळणार असून अनेक भागांना मुसळधार पाऊस व्यापून टाकेल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Monsoon। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
देशाच्या काही भागांत पावसाचा जोर ओसरला असला, तरी मान्सूनचा नवा स्पेल आता सुरू होत असल्याचं सॅटेलाईट फोटोंमधून समोर आलं आहे. बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे 20 ते 24 ऑगस्ट या कालावधीत पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतातील विश्रांतीनंतर हा मान्सूनचा ताजा जोर देशातील पावसाची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करू शकतो.

20 आणि 24 ऑगस्ट महत्त्वाच्या तारखा

मान्सूनचा परतीचा प्रवास, अशी बातमी काल आलेली असतानाच आता त्यात मोठी अपडेट समोर आली आहे. उत्तर आणि पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर, नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या 20 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान पावसाचा एक अत्यंत सक्रिय टप्पा पाहायला मिळणार तुम्हाला मिळणार आहे.

ढगांची गर्दी आणि हालचाली

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) सॅटेलाईट फोटोंमध्ये पूर्व आणि मध्यभारतावर मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी आणि हालचाली दिसून येत आहेत. हे संकेत देशात पुन्हा एकदा सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू होणार असल्याचे दाखवत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचं दिसत आहे.

जमिनीच्या दिशेने सरकणारा कमी दाबाचा पट्टा

मान्सूनच्या या दुसऱ्या धमाक्याला बंगालच्या उपसागरातून जमिनीच्या दिशेने सरकणारा कमी दाबाचा पट्टा (Low-Pressure Area) कारणीभूत ठरत आहे. हो. यासोबतच मान्सून ट्रफची (Monsoon Trough) संभाव्य हालचालही याला गती देत आहे, जी पावसाळ्यात देशभरातील पावसाच्या वितरणावर नियंत्रण ठेवणारी एक मुख्य प्रणाली मानली जाते.

‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान तज्ज्ञांच्या मते, येणारे दिवस उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि छत्तीसगडसाठी या महिन्यातील सर्वात महत्त्वाचे मान्सूनचे दिवस ठरू शकतात; कारण या राज्यांमध्ये वारंवार मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

पुढील 48 तास सर्वाधिक महत्त्वाचे

पुढील 48 तासांत, सर्वाधिक पाऊस मुख्यत्वे पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेश तसेच उत्तराखंडच्या पायथ्याशी असलेल्या भागात एकवटण्याची शक्यता आहे. यामुळे संवेदनशील किंवा सखल भागांमध्ये स्थानिक पातळीवर पूर येणे, पाणी साचणे (जलमय होणे) आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पूर्व भारतावर पावसाच्या दाट ढगांचे पट्टे

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सोमवारच्या दुपारच्या सॅटेलाईट फोटोंमध्ये पूर्व भारतावर पावसाच्या दाट ढगांचे पट्टे पसरलेले पाहायला मिळाले; ज्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि लागून असलेल्या भागांमध्ये वादळी ढगांचे मोठे जत्थे तयार होत आहेत. बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे या हवामान प्रणालीला अधिक सक्षम करत असल्याने, हे ढग आणखी गडद होण्याची शक्यता आहे.

हवामानातील हा बदल पंजाब, हरियाणा आणि दिल्ली-एनसीआरच्या काही भागांमध्ये सुरू असलेल्या कोरड्या टप्प्याचा अंत दर्शवतो. या भागात वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे काही काळासाठी आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले होते.

या आठवड्याच्या उत्तरार्धात मान्सून ट्रफ (Monsoon Trough) प्रथम दक्षिणेकडे सरकेल आणि त्यानंतर पुन्हा उत्तरेकडे झुलत राहील, ज्यामुळे उत्तर भारतातही पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.

‘या’ पावसाची मोठी तूट नोंदवली

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, 20 ते 24 ऑगस्ट दरम्यानचा हा कालावधी मान्सूनच्या एकूण सरासरी पावसासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो; विशेषतः अशा राज्यांसाठी जिथे अद्यापही पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. पावसाच्या या नवीन स्पेलमुळे (टप्प्यामुळे) गंगा-यमुनाचे मैदानी प्रदेश (Indo-Gangetic plains) आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये पावसाचे वितरण सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा