Headlines

104 सामन्यांपैकी फक्त 38 मध्ये संधी, गंभीरला कुलदीपवर विश्वासच नाही! अश्विन टीम मॅनेजमेंटवर रोखठोक बोलला


R Ashwin on Kuldeep Yadav : इंग्लंडमध्ये तिनही एकदिवसीय सामन्यांमध्ये कुलदीप यादवला संघी मिळाली नाही. लॉर्ड्स वनडेमध्ये भारतीय गोलंदाजांनी ३८७ धावा दिल्या. या सगळ्यावरुन आर अश्विनने संघ व्यवस्थापनावर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

R Ashwin on Kuldeep Yadav
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला इंग्लंडमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कुलदीप टी-२० संघातही नव्हता. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याला संधी मिळाली होती, पण मैदानात मात्र तो उतरला नाही. एकाही सामन्यात त्याची निवड झाली नाही.पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघाने वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना फिरकीसाठी संघी दिली. कारण ते फलंदाजीही करु शकणारे खेळाडू आहेत. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळला नाही. संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश झाला त्यात मात्र कुलदीपला बेंचवरच बसावं लागलं.

गौतम गंभीर प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यापासून भारताने १०४ सामने खेळले आहेत. यामध्ये कुलदीपला फक्त ३८ सामन्यांत संधी दिली गेली. त्यामुळे अश्विनने सांगितलं की, कुलदीपने खेळूच नये, त्याची आवश्यकता नाही. हा काळ फलंदाजांचा आहे. त्यांना गोलंदाजांचा आत्मविश्वास आणि लय कधीच समजत नाही. मी भारतीय क्रिकेटचा मोठा चाहता आहे. मी नेहमीच भारतीय क्रिकेटला कसा फायदा होईल याचा विचार करतो, असं अश्विनने म्हटलं आहे.

Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi : वैभव आता सोडत नसतो! WC फायनलमध्ये 175 धावांची तुफानी खेळी, झिम्बाब्वेला भिडण्याआधी सूर्यवंशीने सांगून टाकलंय, म्हणाला…

त्याने पुढे बोलताना म्हटंल की, कुलदीप सध्या अअशा टप्प्यावर पोहोचला आहे. जिथे तो वयाच्या ३५-३६ वर्षांपर्यंत खेळू शकतो. त्याचा खेळही चांगला आहे. नुकताच तो आयपीएल ट्रेडमध्येही दाखल झाला होता. पण इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेनंतर चित्र पूर्णपणे बदललं आहे. बुमराह नसतानाही कुलदीपला संधी मिळत नसेल, तर याचा एकच अर्थ होतो. टीम मॅनेजमेंटचा त्याच्यावर शून्य विश्वास आहे, त्याने आपलं सामान बांधून परत यायला हवं होतं” असं अश्विन म्हणाला.

Maharashtra TimesIND vs ZIM : ‘मीपण पहिल्या बॉलपासून फोडू शकतो’; तिलक वर्माने सांगितलं स्लो खेळण्याचं कारण, मॅनेजमेंटचं नाव घेत काय म्हणाला?

अश्विन पुढे सांगितलं की, “कुलदीप आणखी अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. पण त्याच्यावर अपेक्षित विश्वास दाखवला जात नाही. तो संघाच्या भविष्यातील योजनांचाच भाग आहे की नाही, हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येक प्रशिक्षक किंवा कर्णधाराचे काही आवडते खेळाडू असतात, हे वास्तव आहे. पण कुलदीपच्या बाबतीत जे घडत आहे, ते खूपच विचित्र आहे. इंग्लंड दौऱ्यातील हा निर्णय त्याच्यासाठी मोठा धक्का ठरला.”