Headlines

10 हजारांपेक्षा कमी किमतीत Lava कंपनीचा नवा फोन लाँच, फीचर्सही खास। Maharashtra Times


Lava Launches Smart 4 Plus: कमी बजेटमध्ये दमदार स्मार्टफोन शोधणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी Lava कंपनीने आपला नवीन Lava Smart 4 Plus बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन 4GB मूळ रॅम आणि 4GB व्हर्च्युअल रॅमसह एकूण 8GB रॅमला सपोर्ट करतो. याशिवाय फोनमध्ये तासनतास चालणारी 5000mAh ची मोठी बॅटरी देखील देण्यात आली आहे. याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Lava Smart 4 Plus। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
Lava Launches Smart 4 Plus: 10,000 रुपयांच्या बजेट सेगमेंटमध्ये लावा कंपनीने चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवीन ‘स्मार्ट 4 प्लस’ बाजारात उतरवला आहे. प्रगत रॅम एक्सपॅन्शन तंत्रज्ञानाचा वापर करून युजर्स या फोनमध्ये अखंड मल्टीटास्किंग करू शकतात. स्वस्त किंमत आणि हेवी बॅटरी बॅकअपमुळे हा मेड इन इंडिया फोन सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

Lava Smart 4 Plus स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. हा लेटेस्ट लावा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे, या डिव्हाइसला डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्ससाठी IP64 रेटिंग देण्यात आले आहे.

Lava Smart 4 Plus फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या 4G फोनला कंपनीकडून 2 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट मिळणार आहेत.

Lava Smart 4 Plus किंमत भारतात किती?

Lava Smart 4 Plus या फोनच्या सिंगल व्हेरिएंटची किंमत 9999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा फोन नीलगिरी ब्लू आणि हिमालयन सिल्व्हर रंगात उपलब्ध असेल. कंपनीने म्हटले आहे की, फोनसोबत डोअरस्टेप आफ्टर-सेल्स सर्व्हिसही उपलब्ध असेल. या प्राइस रेंजमध्ये, लावा कंपनीचा हा लेटेस्ट फोन Ai+ Pulse 1 आणि Samsung Galaxy M07 सारख्या स्मार्टफोनमधून आला आहे.

Lava Smart 4 Plus फीचर्स

डिस्प्ले: ड्युअल सिम स्लॉटसह येणाऱ्या या लेटेस्ट लावा स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.75-इंच HD प्लस डिस्प्ले मिळेल.
ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन Android 15 Go वर काम करतो.
चिपसेट: लावा स्मार्ट 4 प्लसमध्ये Unisoc 9863a ऑक्टा-कोर प्रोसेसर, 4 GB रॅम आणि हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज. व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅम 8 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस AI सपोर्टसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेकंडरी कॅमेरा आहे. तसेच फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर असेल.
कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये ब्लूटूथ, 4G आणि Wi-Fi सारखे फीचर्स आहेत.
बॅटरी: फोनमध्ये लाइफ आणण्यासाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी USB Type C पोर्टद्वारे 10 W चार्जिंगला सपोर्ट करते.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा