त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : होन्नीहाळ येथील पूर्ववैमनस्यातून झालेल्या खूनप्रकरणी तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यल्लेशी ऊर्फ डोन्न महादेव तानुगोळ, राघवेंद्र ऊर्फ कुंबी तुकाराम कम्मार, विशाल विठ्ठल हुदली, किरण मल्लेशी मिसाळे, चेतन विजय कवडी, राघवेंद्र अद्रुश्यप्पा दानप्पनवर (सर्व रा. सुळेभावी, ता. बेळगाव), अशी आरोपींची नावे असून नागेंद्र असे मृताचे नाव आहे. न्यायाधीश सविताकुमारी एन. यांनी खटल्याची सुनावणी केली.
नागेंद्र हा 1 जानेवारी 2019 रोजी मनियार लेआऊट, प्लॉट क्र. 3, सर्व्हे क्र. 111/1 येथील एका घराच्या बांधकामावर काम करण्यासाठी गेला होता. काम संपल्यानंतर सायंकाळी 6.30 च्या सुमारास तो हात-पाय धुवत असताना आरोपी मोटारसायकलींसह घटनास्थळी आले. आरोपी हातात लांब काठ्या, तलवार, काठी आदी शस्त्रास्त्रे घेऊन आले होते. आरोपींनी नागेंद्रवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो शेजारील विटांच्या शेडमध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर आरोपींनी दरवाजाला लाथ मारून शेडमध्ये प्रवेश केला. त्यांनी नागेंद्रला खाली पाडून तलवार व काठ्यांनी त्याच्या डोक्मयावर, चेहऱ्यावर, पोटावर, हातांवर आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात नागेंद्रचा मृत्यू झाला. शेडमध्ये पडलेला विटेचा तुकडा नागेंद्रच्या चेहऱ्यावर फेकल्याचेही आरोपात नमूद आहे. त्यानंतर आरोपी शस्त्रे घेऊन मोटारसायकलींवरून घटनास्थळावरून निघून गेले.
दरम्यान तत्कालीन बेळगाव ग्रामीणचे साहाय्यक पोलीस आयुक्त के. शिवारे•ाr यांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींविऊद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 452, 302, 506, 120(ब), 109 सहकलम 34 तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले. यानंतर सर्व साक्षी, पुरावे तपासून न्यायाधीश सविताकुमारी एन. यांनी आरोपींना दोषी ठरविले.
भारतीय दंड संहिता कलम 1204 (ब) अन्वये जन्मठेप, कलम 404 अन्वये 25 हजाराचा दंड, कलम 454 अन्वये 10 हजाराचा दंड, कलम 202 सह-कलम 34 अन्वये 20 हजार दंड, कलम 506 सह-कलम 34 अन्वये 25 हजार दंड व 3 वर्षांचा कारावास, तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलम 3(1)(एस) अंतर्गत 5 वर्षांचा कारावास व 10 हजार ऊपये दंड आणि कलम 3(2)(5) अंतर्गत जन्मठेप व 25 हजार ऊपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी वकील म्हणून आर. जी. देवर•ाr यांनी काम पाहिले.
