Headlines

हवामान विभागाचा टेन्शन वाढवाणारा अंदाज जाहीर, महाराष्ट्रात जुलैअखेरीस सरासरीहून कमी पाऊस; ऑगस्टमध्ये स्थिती काय?| Maharashtra Times


Maharashtra Monsoon: २६ जुलै रोजी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या किनाऱ्यावरील काही भागांत मुसळधार पाऊस होणार असला तरी या प्रणालीचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही. जुलैच्या अखेरीस पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

26 जुलै हवामान
मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढणार आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असला तरी बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी राहणार आहे. त्यामुळे रविवारी, २६ जुलै रोजी महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या पट्ट्याचा काय परिणाम?

उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीत आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे २५ ते २८ जुलैदरम्यान देशातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. २६ जुलै रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यातील नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सातारा आणि ठाणे जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पण जुलै ३० पर्यंत पुन्हा पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंतही मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता कमी आहे. पुढील पंधरवड्यात पावसाच्या सरी बरसतील पण कोणत्याही सक्रीय प्रणालीशिवाय मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस होईल पण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जुलैअखेरीस सरासरीहून कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार २३ ते२९ जुलैदरम्यान दक्षिण आणि मध्य भारत तसेच पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परंतु, राज्यातील उर्वरित भागात सरासरीहून कमी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ३० जुलै तर ५ ऑगस्टदरम्यान दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या बहुतांश भागात आणि पूर्व व मध्य भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. परंतु, भारतात उर्वरित भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

हवामानतज्ज्ञांचा अंदाज काय?

आयएमडी-पुणे येथील शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले की, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे आणि मान्सूनच्या व्यापक सक्रियतेचे कोणतेही संकेत नाहीत. “दुसऱ्या आठवड्याच्या विसंगती नकाशांमध्ये महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर पांढरे ठिपके दिसत आहेत. त्यात नारंगी किंवा लाल रंगाच्या छटा नाहीत, जे दर्शवते की पाऊस सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे,” असे सानप म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, ऑगस्ट महिन्याचा अंतिम अंदाज या महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल.

ते म्हणाले की, शनिवारी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे नवीन क्षेत्र तयार झाले असले तरी, त्याचा महाराष्ट्रावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता नाही. “या प्रणालीमुळे प्रामुख्याने पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काही किनारपट्टीच्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुणे घाटांसाठी रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात केवळ हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर घाटांमधील काही ठिकाणी अतिवृष्टी ते प्रचंड मुसळधार पाऊस पडू शकतो,” असे ते म्हणाले.

Maharashtra TimesMaharashtra Weather: कोकणात मुसळधार पावसाने झोडपलं, मराठवाडा-विदर्भात पावसाची प्रतीक्षा; येत्या दोन आठवड्यांत कसं असेल हवामान?

उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात कसा पाऊस असेल?

नाशिक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये हलका पाऊस राहील. दरम्यान, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना परभणी, बीड हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. वादळी वारे ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणार आहे.

विदर्भात पावसाचा अंदाज

रविवारी अकोला,अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटास वादळी पाऊस होणार आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असून त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा