Headlines

सातपैकी चार धरणं तुडुंब भरली, ओसंडून वाहू लागली; पण मुंबईतील पणीकपात कायम; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कमी पावसाचा अंदाज| Maharashtra Times


Mumbai Water Stock: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या जवळपास ७०% पर्यंत पोहोचला असला तरी, जलाशयांची पातळी कमी झाल्यामुळे १५ मे पासून लागू केलेली १०% पाणी कपात बीएमसी मागे घेण्याची शक्यता कमी आहे .

मोडक सागर धरण
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी मोडक सागर धरण बुधवारी मध्यरात्रीनंतर २ वाजून ७ मिनिटांनी ओसंडून वाहू लागले. त्यामुळे या धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला. आतापर्यंत सात धरणांपैकी चार धरणे पूर्णपणे भरली अलून सातही धरणात मिळून एकूण क्षमतेच्या ७० टक्के पाणीसाठा आहे. मात्र ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसावर ‘एल निनो’चा असलेला प्रभाव आणि अद्याप धरणे समाधानकारक भरली नसल्याने पाणीकपात मागे घेणार नसल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईकरांवरील दहा टक्के पाणीकपात कायम राहणार आहे.

मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी, तानसा या सात धरणांतून मुंबईकरांना दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. या धरणांची एकूण साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर आहे. गेल्या काही दिवसांत धरण क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर ओसंडून वाहू लागलेल्या मोडक सागर धरणाची कमाल क्षमता एक लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लीटर आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात ९ जुलैला मोडक सागर धरण ओसंडून वाहू लागले होते. या धरणात सध्या ६९.७४ टक्के इतका पाणीसाठा आहे.

Maharashtra TimesMaharashtra Weather: जुलैअखेरीस महाराष्ट्रात कोसळधारा, ऑगस्ट येताच पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज

सर्व धरणे भरल्यानंतरच कपात मागे

यासंदर्भात बोलताना, चार धरणे भरली तरीही पाणीकपात मागे घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. सप्टेंबरच्या अखेरीस १०० टक्के – पाणीसाठा झाला, तरच पाणीकपात -मागे घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य पाटबंधारे विभागाने अलीकडेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढील वर्षीच्या ३१ ऑगस्टपर्यंत पाणी नियोजन करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसारच नियोजन केले जात असल्याचे ते म्हणाले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये एल निनोचा प्रभाव अधिक राहणार असल्याने पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीकपात मागे घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबद्दल माहिती दिली, “आम्ही दहा दिवसांपूर्वीच पाणीकपात मगे घेऊ शकलो असतो. २०२४ मध्ये यावेळी जितका पाणीसाठा आहे त्यापेक्षा कमी होता. परंतु, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अनिश्चित पाऊस ही चिंतेची बाब आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याच निर्बंध तात्काळ उठवले जातील. सध्या मुंबईचा पाणीसाठी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पुरेसा आहे. पण राज्य पाटबंधारे विभागाच्या निर्देशांमुळे पाणीकपात कायम ठेवण्यात आली आहे.

Maharashtra TimesMumbai-Pune Railway: मुंबई-पुणे रेल्वेमार्गासाठी नवा प्रकल्प, कर्जत ते लोणावळादरम्यान आपत्कालीन रस्ता उभारणार; मध्य रेल्वेचा निर्णय

वर्षभर पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मुंबईतील सातही जलाशयांमध्ये १४.४७ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठी असणं आवश्यक आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे एकूण साठा १०.०९ लाख दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. सध्याचे निर्बंध १५ मेपासून सुरू झाले असून ते ३० सप्टेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा