Headlines

वनप्लसचा धमाका! भारतात पुढील आठवड्यात लाँच होणार स्वस्त ‘OnePlus N6x’ स्मार्टफोन। Maharashtra Times


प्रसिद्ध टेक ब्रँड वनप्लस (OnePlus) आपल्या बजेट-फ्रेंडली ‘N’ सीरीजचा विस्तार करत असून भारतीय ग्राहकांसाठी पुढील आठवड्यात 31 जुलै रोजी नवा ‘OnePlus N6x’ स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने अधिकृतपणे या स्वस्त फोनच्या लाँचिंगची पुष्टी केली असून, याद्वारे किफायतशीर बजेटमध्ये प्रगत फीचर्स उपलब्ध करून देण्याचा वनप्लसचा प्रयत्न आहे. चला तर मग जाणून घेऊया.

OnePlus N6x। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
भारतीय स्मार्टफोन बाजारात वनप्लस पुन्हा एकदा स्वस्त स्मार्टफोनच्या श्रेणीत जोरदार टक्कर देण्यास सज्ज झाली आहे. कंपनीने आपल्या अपकमिंग मॉडेल ‘ OnePlus N6x ‘ च्या लाँचची अधिकृत घोषणा केली असून तो थेट अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. कमी किमतीत वनप्लसचा प्रीमियम अनुभव शोधणाऱ्या युजर्ससाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

OnePlus ने खुलासा केला आहे की, भारतीय बाजारात ग्राहकांसाठी OnePlus N6x कोणत्या दिवशी लाँच केला जाईल. कंपनीने या आगामी स्मार्टफोनचे डिझाइन दर्शविण्यासाठी अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर एक स्वतंत्र मायक्रोसाइट देखील तयार केली आहे.

फोनमध्ये पिल-शेप्ड रियर कॅमेरा मॉड्यूल

मायक्रोसाइटवरून याची पुष्टी करण्यात आली आहे की, OnePlus N6x हा फोन दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल. हा फोन कंपनीच्या N सीरिजमध्ये लाँच केला जाणार आहे, या फोनमध्ये पिल-शेप्ड रियर कॅमेरा मॉड्यूल आहे.

OnePlus N6x भारतात लाँच होणार

कंपनीच्या N सीरिजमध्ये येणारा हा नवीन फोन भारतीय बाजारात ग्राहकांसाठी 31 जुलै रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. याशिवाय मायक्रोसाइटने कलर ऑप्शन्सचीही पुष्टी केली आहे, ज्यावरून असे दिसून येते की हा फोन बरगंडी रेड आणि आइस ब्लूमध्ये लाँच केला जाईल.

3.5 एमएम ऑडिओ जॅक

फोनचे डिझाईन पाहता लक्षात येते की, हँडसेटच्या टॉपवर 3.5 एमएम ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस पिल शेप्ड कॅमेरा मॉड्यूलमध्ये सिंगल कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे.

कॅमेरा मॉड्यूलच्या बाजूला एलईडी फ्लॅश

कॅमेरा मॉड्यूलवर एक दुय्यम कटआउट देखील व्हिजिएबल आहे, जो दुय्यम प्रकाश सेन्सरसाठी असू शकतो. कॅमेरा मॉड्यूलच्या बाजूला एलईडी फ्लॅश देखील आहे. या फोनमध्ये टेक्सचर्ड फ्लॅट रियर पॅनेल देखील आहे, ज्यामध्ये वनप्लस ब्रँडिंग आहे. स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कंट्रोल दिसत आहे.

अशी देखील माहिती आहे की OnePlus N6x भारतात Amazon आणि OnePlus ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. डिझाइनच्या बाबतीत हा फोन वनप्लस नॉर्ड सीई 6 लाइटसारखाच आहे. कंपनीच्या एन सीरिजने काही काळापूर्वी वनप्लस एन6 देखील लाँच केला आहे, ज्याची किंमत 22999 रुपयांपासून सुरू होते, या किंमतीत 4 GB रॅम आणि 128 GB व्हेरिएंट आहेत.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा