Headlines

समुद्रातील पहिलं विमानतळ मुंबईजवळ उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पण केंद्राकडे अद्याप प्रस्ताव नाहीच; कारण काय?| Maharashtra Times


Offshore Airport: देशातील पहिलं समुद्रातील विमानतळ पालघरमधील वाढवणमध्ये उभारण्याची घोषणा केली गेली होती. निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सभांमध्ये या घोषणा केल्या होत्या. परंतु अद्याप केंद्राकडे विमानतळाबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव दिला गेला नाही अशी माहिती समोर आली आहे.

palghar (vadhavan airport)
म. टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाबाबत राज्य सरकारकडून अद्याप केंद्र सरकारकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नायडू यांनी ही बाब स्पष्ट केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीदरम्यान, तसेच मिरा-भाईंदर आणि वसई परिसरातील जाहीर सभांमध्ये विमानतळ उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात अद्याप राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रस्ताव सादर झालेला नाही. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात डॉ. सवरा यांनी पालघर विमानतळ प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. विकासासोबतच स्थानिक मच्छिमारांच्या रोजगाराचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वाढवण बंदराजवळ समुद्रात (ऑफशोअर) विमानतळ उभारण्याच्या संकल्पनेमुळे मासेमारी क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

Maharashtra TimesVadhavan Airport: मुंबई शेजारीच उभारणार पहिलं समुद्रातील विमानतळ; 45 हजार कोटींचा खर्च; सी-लिंक, बंदराशी थेट जोडणी, कुठे होणार?

यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नायडू यांनी सांगितले की, विमानतळ जमिनीवर असो किंवा समुद्रात, पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक आहे. मच्छिमारांच्या समस्या आणि पर्यावरणाचा सखोल अभ्यास व सर्वेक्षण केल्याशिवाय प्रकल्पाला मंजुरी दिली जाणार नाही. आक्षेप आढळल्यास त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केवळ घोषणा

राज्य सरकारने जागा निश्चित करून प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार विमानतळासाठी तातडीने पुढील प्रक्रिया सुरू करेल, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेमध्ये दिले. त्यामुळे सध्या विमानतळाबाबत केवळ घोषणाच झाल्या असून, प्रत्यक्ष प्रस्तावाची प्रक्रिया अद्याप रखडलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Maharashtra TimesNavi Mumbai Airport: 12 तासांऐवजी आता 24 तास उड्डाणे, नवी मुंबई विमानतळावर आजपासून सेवांचा विस्तार; एप्रिल महिन्यापर्यंत…

पश्चिम रेल्वेवर चार वाढीव फेऱ्या

साध्या लोकल फेऱ्या रद्द करून त्याजागी एसी लोकल सुरू करण्याच्या निर्णयामुळे त्रासलेल्या सर्वसामान्य प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. तब्बल १४ महिन्यांनंतर पश्चिम रेल्वेने चार विनावातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार, १ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा